आयफेल टॉवर खाली मिताली-सिद्धार्थचा चक्क लिपलॉक, रोमँटिक फोटो व्हायरल

Mitali Mayekar Sidharth Chandekar Kissing Photo: अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हे कपल कायमच चर्चेत असते. त्यांच्या रोमॅण्टिक फोटोंमुळे तर ते कायमच चर्चेत असतात. आता त्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर त्यांनी शेअर केला आहे ज्यात चक्क आयफेल टॉवरच्या खाली त्यांनी लिपलॉक फोटो शूट केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 6, 2023, 06:46 PM IST
आयफेल टॉवर खाली मिताली-सिद्धार्थचा चक्क लिपलॉक, रोमँटिक फोटो व्हायरल title=
June 6, 2023 | Actress mitali mayekar shares her paris trip photo with romantic lip lock photoshoot with husband siddarth chandekar at eiffel tower (Photo: Mitali Mayekar | Instagram)

Mitali Mayekar and Siddharth Chandekar Lip Lock in Paris: मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या युरोप ट्रिपची कोण चर्चा रंगली होती. त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. त्याचबरोबर त्यांच्या या फोटोंना सोशल मीडियावर तूफान लाईक्स मिळाले होते. आता त्यांच्या अजून एका रोमॅण्टिक फोटोनं चाहत्यांना वेड लावलं आहे. यावेळी त्यांनी चक्क पॅरिसमध्ये आयफेल टॉवरच्या खाली रोमॅण्टिक लिपलॉकमधला फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोला सोशल मीडियावर तूफान लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहे. आपल्या पॅरिसच्या आगळ्यावेगळ्या शूटबद्दल अभिनेत्री मिताली मयेकरनं इन्टाग्रामवरून लवकरच पोस्ट करणार असल्याची माहिती दिली होती.

आता तिनं आपलं हटके हटके फोटोशूट सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. या पोस्टखाली तिनं एक कॅप्शन लिहिलं आहे ज्यात ती म्हणते, कारण, तू पाहणं, तूला दररोज जास्त प्रेम करणं, आजपेक्षाही उद्या अधिक आणि त्यापेक्षाही पुढे अधिक करत राहीनं, उद्या करेन ते आजच्यापेक्षा कमीच आहे, असं रोझमोन्ड रेरार्ड यांचे वाक्य तिनं फ्रेंचमध्ये पोस्ट केलं आहे. टायनी पांडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कपलनं आपल्या या फोटोशूट चाहत्यांना पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमात भाग पाडायला भाग पाडले आहे. सोबतच ही तर फक्त झलक आहे, पिक्चर अजून बाकी आहे. हा फक्त एकच फोटो मिताली आणि सिद्धार्थनं शेअर केला आहे परंतु त्यापलीकडेही अजूनही त्यांचे हटके रोमॅण्टिक फोटो हे मिताली आणि सिद्धार्थ शेअर करतील, त्याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

हेही वाचा - ठरलं! रूपेरी पडद्यावर आकाश ठोसर साकारणार 'बाल शिवाजी', कशी वाटली निवड?

जानेवारी 2021 मध्ये मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी लग्न केले, त्यांच्या लग्नाचे फोटोही जोरात व्हायरल झाले होते. त्यांच्याआधीपासून त्यांच्या अफेअरचही बरीच चर्चा रंगली होती. त्याचबरोबर ते लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते याचीही चर्चा रंगली होती. फायनली, सिद्धार्थ आणि मितालीनं लग्न केले आणि त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. इन्टाग्रामवरही ती दोघं आपले डेली अपडेट्स, ट्रॅव्हल ट्रीप, रोमॅण्टिक डेट आणि इतरत्र फोटोज हे शेअर करताना दिसतात. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता त्यांच्या या फोटोनं पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपुर्वी मितालीनं आपल्या ऑरेंज बिकीनीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावेळी आपल्या कॅप्शनमुळे ती जास्त चर्चेत आली होती. तिच्या या फोटोलाही 60 हजार लाईक्स आले आहेत. तिच्या या फोटोचीही बरीच चर्चा रंगली होती.