मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत आज 9 सप्टेंबरला मुंबईला येणार आहे. मंडी येथून ती मुंबईसाठी रवाना झाली आहे. ती चंदीगड ते मुंबई विमानाने येणार आहे. कंगनाचं घर हिमाचलच्या मंडीमध्ये आहे.
बुधवारी कंगनाने ट्विट करत म्हटले की, 'मी राणी लक्ष्मीबाईंचे धैर्य, पराक्रम आणि त्याग हे चित्रपटाद्वारे जगली आहे. दुःखाची बाब म्हणजे मला महाराष्ट्रात येण्यापासून रोखले जात आहे. मी राणी लक्ष्मीबाईंच्या पदचिन्हांवर चालेल आणि झुकणार नाही. मी चुकीच्या विरोधात आवाज उठवतच राहीन. जय महाराष्ट्र, जय शिवाजी.'
मुंबईत जाण्यापूर्वी दोनदा कंगना रनौतची कोरोना टेस्ट झाली असल्याची माहिती आहे. कोरोना चाचणीसाठी घेतलेला कंगनाचा पहिला नमुना योग्य नव्हता. ज्यामुळे तिचा चाचणी अहवाल आला नाही. म्हणून या चाचण्या पुन्हा घेण्यात आल्या. पण दुसरा कोरोना चाचणी अहवाल नेगेटिव्ह आला आहे. कंगनाचा मुंबईला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कंगना दुपारी चंदीगडहून मुंबईला रवाना होईल. दुपारी 12.15 वाजता तिच विमान निघणार आहे. दुपारी अडीच वाजता हे विमान मुंबईला पोहोचेल.
गेल्या काही दिवसांपासून कंगना आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. केंद्र सरकारने कंगनाला वाय प्लस सुरक्षा दिली आहे. दुसरीकडे शिवसेना आमदारांना सभागृहात कंगनाच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला होता. कंगनावर कारवाईची मागणी शिवसेनेच्या आमदारांकडून होत आहे.कल्ल