'या' कारणासाठी अभिनेत्री गौहर खान राहत नाही सासरच्या लोकांसोबत

मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान तिच्या लग्नापासून सतत चर्चेत आहे.

Updated: Aug 4, 2021, 07:27 PM IST
 'या' कारणासाठी अभिनेत्री गौहर खान राहत नाही सासरच्या लोकांसोबत title=

मंबई : बिग बॉस 7 ची विजेती, मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान तिच्या लग्नापासून सतत चर्चेत आहे. तिने डिसेंबर 2020 मध्ये स्माईल दरबारचा मुलगा झैद दरबारशी लग्न केलं. बिग बॉस 7 जिंकल्यानंतर गौहर खानचा चाहता वर्ग खूप वाढला आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत राहते. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नजर टाकल्यास तिची सोशल मीडियावरील सक्रियता दिसून येते. ती अनेकदा रील्स व्हिडिओ शेअर करते. तिचा पती झैद दरबार देखील काही रील्स व्हिडीओमध्ये दिसतो. 

नुकताच गौहर खानने एक आगळा वेगळा रील्स व्हिडिओ बनवला आहे, जो तिने तिच्या चाहत्यांना डेडिकेट केला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओ पोस्टसोबत, गौहरने लिहिलं आहे की, 'तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देईन'. यानंतर, चाहत्यांचे प्रश्न आणि अभिनेत्रीची उत्तरे रील व्हिडिओमध्ये मजकुराच्या स्वरूपात दिसतात. गौहरला पहिला प्रश्न विचारण्यात आला, 'तुला मूल कधी होणार?', या प्रश्नावर गौहरने उत्तर दिलं आहे की, 'अल्लाहला जेव्हा आवडेल.' दुसरा प्रश्न विचारला गेला की तू सासरच्या लोकांसोबत का राहत नाही? यांवर उत्तर देत गौहर म्हणाली की, 'मी आणि जैदने आपल्यासाठी योग्य असलेल्याची निवड केली आहे.'तर एका युजरने विचारलं की, 'तू लग्नापासून सतत का काम करत आहेस?' यावर गौहर म्हणाली. 'मी यासाठी काम करत आहे 20 वर्षांपासून काम करत आहे आणि मी 80 वर्षांची होईपर्यंत काम करत राहीन. 'शेवटी तिने चाहत्यांना' जगा आणि जगू द्या असा संदेश दिला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गौहर खान प्रत्येक विषयावर आपलं मत मुक्ततेने व्यक्त करण्यासाठी ओळखली जाते. कोरोना काळात गौहरने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झैद दरबारशी लग्न केलं. झैद आणि गौहर यांची भेट ग्रॉसरी शॉपिंग दरम्यान झाली होती. दोघंही अनेकदा इन्स्टाग्रामवर डान्सिंग व्हिडिओ शेअर करतात.