सासरी पोहोचताच दीपिकाला हे काय करावं लागतंय, तिला ओळखणंही कठीण

चाहते हैराण 

Updated: Dec 30, 2021, 05:53 PM IST
सासरी पोहोचताच दीपिकाला हे काय करावं लागतंय, तिला ओळखणंही कठीण  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : लग्नानंतर आयुष्य बदलतं असं म्हटलं जातं. कित्येकांच्या बाबतीत ही गोष्ट खरी ठरते, तर काहीजण मात्र याला अपवाद ठरतात. आतापर्यंत कलाजगतामध्ये लग्नानंतर अनेक अभिनेत्रींना त्यांच्या जीवनातील मोठ्या बदलांना सामोरं जावं लागलं आहे. 

काही अभिनेत्रींनी हे बदल सकारात्मकरित्या स्वीकारले, तर काहींना मात्र यात अडचणी आल्या. 

लग्नानंतरचे हे बदल स्वीकारणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे, दीपिका कक्कर. 

मालिकांच्या माध्यमातून आणि रिअलिटी शोमधून लोकप्रिय झालेली दीपिका लग्नानंतर दीपिका कक्कर इब्राहिम म्हणून ओळखली जाऊ लागली. 

अभिनेता शोएब इब्राहिम याच्याशी तिनं लग्नगाठ बांधली. दीपिकाचं आयुष्य त्यानंतर बरंच बदललं. सध्या हीच अभिनेत्री तिच्या मूळ सासरी म्हणजेच कानपूरला पोहोचली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shoaib Ibrahim (@shoaib2087)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dipika (@ms.dipika)

रेल्वेमार्गानं ही जोडी मौदहा येथे पोहोचली. बऱ्याच वर्षांनंतर ती इथं आल्यामुळं सासरच्यांनीही तिचं दणक्यात स्वागत केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shoaib Ibrahim (@shoaib2087)

सोशल मीडियावर तिनं कानपूर दौऱ्याचे काही क्षण सर्वांच्या भेटीला आणले. यामध्ये कुठं ती सरसों, म्हणजेच राईच्या शेतात बागडताना दिसली, तर कुठे स्वयंपाकघरात जेवण बनवताना दिसली. 

देश तसा वेश, असं म्हणतात ना ते अगदी खरंच आहे. दीपिकाच्या पोस्ट पाहून तुम्हालाही ही बाब पटेल यात शंका नाही.