दीपिकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच होणार...?

अभिनेत्री Dipika च्या चाहत्यांसाठी Good News! हे लोकप्रिय जोडपं लवकरच होणार आई-वडील

Updated: Dec 21, 2022, 05:11 PM IST
दीपिकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच होणार...?  title=

Dipikar Kakar Got Pregnant : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दीपिका कक्कड (Dipika Kakar) ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. दीपिका अभिनेता आणि सहकलाकार शोएबनं (Shoaib Ibrahim) त्यांच्या चाहत्यांना एक मोठी बातमी दिली आहे. दीपिका लवकरच आई होणार असल्याची बातमी ऐकायला मिळत आहे. लग्नाच्या 4 वर्षांनतर दीपिका आणि शोएब च्या आई-वडील होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, त्या दोघांपैकी कोणीही या बातमीला दुजोरा दिलेला नाही. 

दीपिका आणि शोएब हे त्यांच्या प्रेग्नंसीविषयी काहीही बोलले नाही. परंतू शोएबची बहिन सबा इब्राहिमनं तिच्या व्लॉगमध्ये वहिनी दीपिकाच्या प्रेग्नंसीविषयी इशारा दिला आहे. YouTuber सबा तिच्या व्लॉगमध्ये चाहत्यांशी बोलताना म्हणाली की, वहिनी दीपिकाची तब्येत ठीक नाही. याआधी जेव्हा सबा इब्राहिम तिच्या व्लॉगमध्ये लग्नाच्या भेटवस्तू अनबॉक्स करत होती, तेव्हा तिचं संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होतं. पण दीपिका कक्कर तेथेही नव्हती. सबाने व्लॉगमध्ये म्हटले होते, दीपिका तब्येत बरी नसल्याने ती बाजारात गेली नाही. इतकंच नाही तर दीपिकाचा व्लॉग पाहिल्यानंतरही तिला प्रेग्नंट असल्याच्या सूचना लोकांना मिळाल्या.

हेही वाचा : 'प्रचंड दुःख होतं जेव्हा...', 'त्या' कारणामुळे Shahrukh Khan बंद खोलीत मुलांसोबत ढसाढसा रडला

दीपिकानं तिच्या एका व्हिडीओमध्ये क्रेव्हिंग्सबद्दल सांगितलं. सतत मिळणाऱ्या या हिंट्स पाहून नेटकऱ्यांनी अंदाज लावला आहे की दीपिका कदाचित आई होणार आहे. त्यामुळेच तिची तब्येत खराब होत असते. तर दुसरीकडे ती वेगवेगळ्या फूडच्या डीश बनवते, कारण गरोदरपणात तिला वेगवेगळ्या गोष्टी खाव्याश्या वाटतात. चाहत्यांना आशा आहे की दीपिका आणि शोएब प्रेग्नंसीच्या बातमीवर लवकरच उत्तर देतील. यामुळे लवकरच सत्य समोर येईल की नक्की दीपिका प्रेग्नंट आहे की नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दीपिका आणि शोएब हे टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांची जोडी ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. 'ससुराल सिमर का 2' या मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली. 22 फेब्रुवारी 2018 रोजी त्यांच लग्न झालं होतं. अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दीपिका आणि शोएबने लग्न केले. करिअरविषयी बोलायचं झालं तर दीपिका सगळ्यात शेवटी 'ससुराल सिमर का 2' या मालिकेत छोट्या भूमिकेत दिसली. त्यानंतर दीपिका ही सध्या टीव्ही शोपासून दूर आहे. (actress dipika kakar pregnant expecting first child saba ibrahim drop hints)