मुंबई : अभनेता सलमान खानचं नाव अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. त्यामधील एक म्हणजे अभिनेत्री भाग्यश्री. भाग्यश्री आणि सलमान 1989 साली प्रदर्शित झालेल्या 'मैंने प्यार किया' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले. त्यांच्या जोडीला चाहत्यांनी चांगलचं डोक्यावर घेतलं. 'मैंने प्यार किया' सिनेमातून भाग्यश्रीने पदार्पण केलं आणि एका रात्रीत स्टार झाली. सिनेमानंतर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणत वाढली.
पण सिनेमात भाग्यश्रीला लोकांकडून गरिबीमुळे अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्या... सिनेमात भाग्यश्री आणि सलमान एकमेकांवर प्रचंड प्रेम करतात असं दाखवण्यात आलं. पण यासाठी त्यांना अनेक वाईट प्रसंगांचा सामना करावा लागला. पण तेव्हा सलमानवरील प्रेमासाठी इतरांची बोलणी ऐकणाऱ्या अभिनेत्रीची मुलगी आज बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
करियरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना भाग्यश्रीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि अभिनयापासून दूर झाली. भाग्यश्रीने अध्यातचं करियरला बाय-बाय केलं आणि नवीन प्रवास सुरू केला. भाग्यश्रीने लग्न केलं. भाग्यश्रीला एक मुलगा अभिमन्यू दसानी आणि एक मुलगी अवंतिका दसानी आहे. जर सलमानचं देखील लग्न झालं असतं तर त्याला देखील अवंतिका एवढी मुलगी असती.
आता भाग्यश्रीची मुलगी अवंतिका देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अवंतिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अवंतिकाच्या सौंदर्यापुढे अभिनेत्री सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, आलिया भट्ट यांचं सौंदर्य देखील फिक आहे.
अवंतिकाही तिची आई भाग्यश्रीपेक्षाही सुंदर आहे. सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो तिच्या सौंदर्याचा पुरावा आहे. इन्स्टाग्रामवर अवंतिकाचे हजारो फॉलोअर्स आहेत. याशिवाय अवंतिकाला प्रवास, डान्स, फॅशन आणि मित्रांसोबत पार्टी करणे आवडते.