मुंबई : सलमान खानचं नाव घेतलं, की त्याला वेगळी ओळख करुन द्यायची गरज लागत नाही. एक अभिनेता म्हणून सलमाननं गेल्या कित्येक दशकांमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सुरुवातीपासूनच सलमाननं प्रेक्षकांवर आपली छाप पाडली.
पाहता पाहता त्याची लोकप्रियता वाढली. बऱ्याच अभिनेत्रींशी त्याचं नावही जोडलं गेलं. पण, तुम्हाला माहितीये का सलमानचं नाव यापैकीच एका अभिनेत्रीमुळं भलत्याच कारणानं चर्चेत आलं होतं. म्हणे, सलमानला त्या अभिनेत्रीनं धमकी दिली होती.
मागील काही दिवसांत सलमानला येणाऱ्या धमक्या पाहता हे आणखी एक जुनं धमकी प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. धमकी प्रकरणामुळे चर्चेत आलेली ही अभिनेत्री आहे भाग्यश्री. (Actress bhagyashree warned salman khan for big reason)
'मैने प्यार किया' या चित्रपटातून सलमानसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या भाग्यश्रीला पहिल्याच चित्रपटानं यश दिलं. पण, तिनं त्याच्यासोबतचा दुसरा चित्रपट मात्र नाकारला. पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर भाग्शश्रीनं सलमानला दरडावलं होतं.
'दिल दिवाना' या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान सलमान हे गाणं भाग्यश्रीच्या कानात गुणगुणत तिला सतावत होता. तू जवळ येऊ नको; असंच ती त्याला एकसारखं दरडावून होती. सलमानशी आपलं नाव जोडलं तर जाणार नाही, याचीच भीती त्याला सतावत होती.
बराच वेळ भाग्यश्रीला सतावल्यानंतर अखेर सलमाननं तिला, आपल्याला तिच्या आणि हिमालयच्या नात्याची माहिती असल्याचं त्यानं तिला सांगितलं.
भाग्यश्रीचा पती फारच Possessive
पहिल्याच बॉलिवूड चित्रपटानंतर कलाजगतातून काढता पाय घेणाऱ्या भाग्यश्रीनं सांगितल्यानुसार तिचा पती हिमालय फारच possessive आहे. आपल्या पत्नीनं कोणा दुसऱ्या अभिनेत्याशी जवळीक साधू नये असं त्याचं मत.