ब्रावर फाटलेला टॉप घातल्याने अभिनेत्रीवर नेटकरी संतापले, म्हणाले...

सध्या मानुषीचे बोल्ड फोटोज सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत

Updated: Aug 10, 2022, 08:44 PM IST
ब्रावर फाटलेला टॉप घातल्याने अभिनेत्रीवर नेटकरी संतापले, म्हणाले... title=

Manushi Chillar Bold Photoshoot: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटात संयुक्ताची भूमिका साकारणाऱ्या मानुषी छिल्लरच्या अभिनयाचे तिच्या चाहत्यांमध्ये विशेष कौतुक झाले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बऱ्यांपैकी चालला पण प्रेक्षकांना मात्र फारसा रूचला नाही. सध्या मानुषीचे बोल्ड फोटोज सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तिच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या बोल्ड शूटचे फोटो इंस्टाग्रामवर तिने शेअर केले आहेत त्यामुळे तिला ट्रोल देखील केले जात आहे.

मानुषी छिल्लरने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये तिने ब्रालेटवर ग्रे कलरचा टॉप घातला आहे. तिचे केस मोकळे आहेत आणि तिने लाईट मेकअप केला आहे. फोटोमध्ये पोज देताना मानुषीची स्लिम आणि टोन्ड फिगरही सुरेख दिसत आहे. मानुषी छिल्लरच्या फोटोंना 19 तासांत इंस्टाग्रामवर 161000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर फोटोंवर 748 कमेंट करण्यात आल्या आहेत. अनेकांनी फोटोंवर हार्ट आणि फायर इमोजी देखील टाकले आहेत. तर अनेकांनी त्यावर तिच्या सौंदर्याची स्तुती करणारे कमेंट्सही केल्या आहेत. ब्रालेटवर ग्रे कलरचा भोकं असणारा टॉप मानुषीने घातला आहे त्यामुळे हा लुक पाहून अनेकांनी तिची खिल्लीही उडवली आहे. 

अनेकांनी मानुषी छिल्लरला ट्रोलही केले आहे. एकाने लिहिले आहे की, 'आमच्या गावातील मुली कपडे यापेक्षा चांगले कपडे घालतात.' तर एका नेटिझननं म्हटलंय की, 'तूला काय कुत्रा चावला आहे का?' तर एकाने म्हटलंय की 'कपडे का फाडले?'. अशा अनेक नकारात्मक कमेंट्स मानुषीच्या अकांऊटवर पाहायला मिळत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मानुषी छिल्लरने मिस वर्ल्डचा पुरस्कारही जिंकला आहे. मानुषी छिल्लर नुकतीच 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटात दिसली होती.या चित्रपटात तिच्याशिवाय अक्षय कुमारचीही महत्त्वाची भूमिका होती. तिचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.