मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे चित्रपट जगतापासून दूर असली तरी लोकप्रियतेच्या बाबतीत ती एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. गेल्या काही दिवसांपासून अलाना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतीच तिने बॉयफ्रेंड इव्होर मॅकक्रेशी एंगेजमेंट केली, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
अलाना कुटुंब आणि मित्रांसोबत खूप मजामस्ती करते. त्यात आता प्रँक करत अलना पांडेने पालकांना असे काही सांगितले, जे ऐकून त्यांना धक्काच बसला.
अलना पांडे एक YouTuber आहे. ती अनेकदा तिच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत असते. एकदा अलाना पांडे यांना वाटले की, कुटुंबातील सदस्यांसोबत प्रँक करावा. तिने गर्भवती असल्याचे पालकांना सांगितले आणि त्यांच्या प्रतिक्रिया कॅमेऱ्यात रेकॉर्ड केल्या. हा व्हिडिओ तिने तिच्या यूट्यूब चॅनलवरही अपलोड केला आहे. अलानाचा बॉयफ्रेंड देखील या प्रँकमध्ये सामील होता.
गरोदरपणाची बातमी ऐकून आईला धक्का बसला
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अलाना पहिल्यांदा तिच्या आईला फोन करते आणि म्हणते की, मी प्रेग्नंट आहे, जे ऐकून ती हैराण झाली आणि म्हणते, 'असे कसे होऊ शकते की तू आता एंगेज नाही आहेस ना लग्न केले आहेस.
अलना पांडेच्या गरोदरपणाबद्दल ऐकून तिच्या आईला धक्काच बसला. मात्र, तिच्या आईची प्रतिक्रिया पाहून अलाना हसते, हे पाहून आईला समजते की अलाना तिच्यासोबत विनोद करत आहे. यानंतर सगळे एकत्र हसायला लागतात.