गरोदर असताना आलियाला सतत खावासा वाटायचा 'हा' पदार्थ; कोलकाताशी आहे खास कनेक्शन

आलिया आणि रणबीरने एका ख्रिसमस पार्टीदरम्यान राहाचा चेहरा सर्वांना दाखवला होता. त्यावेळी राहाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. 

Updated: Mar 14, 2024, 05:06 PM IST
गरोदर असताना आलियाला सतत खावासा वाटायचा 'हा' पदार्थ; कोलकाताशी आहे खास कनेक्शन title=

Alia Bhatt Pregnancy : बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला ओळखले जाते. ते दोघेही सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे चित्रपटासोबत खासगी आयुष्यामुळेही प्रसिद्धीझोतात असतात. आलिया आणि रणबीरने 14 एप्रिल 2022 रोजी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर लगेचच आलियाने ती गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2022 रोजी राहाला जन्म दिला. पण आता आलियाच्या डोहाळ्यांची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची लाडकी लेक राहा ही सध्या लोकप्रिय आहे. आलिया काही महिन्यांपूर्वीच एक वर्ष पूर्ण झाले. ती एक वर्षाची झाल्यानंतर आलिया आणि रणबीरने तिचा चेहरा दाखवला होता. आलिया आणि रणबीरने एका ख्रिसमस पार्टीदरम्यान राहाचा चेहरा सर्वांना दाखवला होता. त्यावेळी राहाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यानंतर आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडींग सोहळ्यावेळी राहाची चर्चा रंगली होती. 

आलियाने संपूर्ण गरोदरपणात खाल्ला 'हा' पदार्थ

आलियाने गरोदर असताना आतापर्यंत अनेक किस्से सांगितले आहेत. आता आलियाची आहारतज्ज्ञ सुमन अग्रवाल यांनी तिच्या गरोदरपणाबद्दलचे अनेक खुलासे केले आहेत. सुमन अग्रवाल यांनी एका पॉडकास्टमध्ये तिच्याबद्दल भाष्य केले. यावेळी त्या म्हणाल्या, "लाडक्या लेकीच्या जन्मावेळी आलियाला एक खास बंगाली पदार्थ खायची सतत इच्छा व्हायची. आलिया गरोदर असताना मला अनेकदा फोन करायची आणि त्यावेळी ती मला कोलकाता येथील ‘नोलेन गुड संदेश’ (Nolen Gur Sandesh) हा पदार्थ आणण्यास सांगायची. तिला तो पदार्थ खूप आवडायचा. ‘नोलेन गुड संदेश’ खायची प्रचंड इच्छा असायची. तिने संपूर्ण गरोदरपणात हा पदार्थ खाल्ला आहे.”

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt  (@aliaabhatt)

दरम्यान 6 नोव्हेंबर 2022 मध्ये राहाचा जन्म झाल्यावर आलियाने दीड महिने विश्रांती घेतली होती. त्यानंतर ती पुन्हा कामावर परतली. राहाच्या जन्मानंतर अवघ्या 4 महिन्यातच आलियाने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील “तुम क्या मिले…” या गाण्याचे बर्फात शूटींग केले होते. आता आलिया लवकरच जिगरा या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट 2024 या वर्षातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.