एकेकाळी लिव्ह इनमध्ये पती-पत्नीप्रमाणे राहणारे कलाकार आज एकमेकांचे कट्टर शत्रू

नातं तुटल्यानंतर या कलाकारांना आता एकमेकांचं तोंड देखील पाहायचं नाहीये

Updated: Sep 30, 2021, 01:15 PM IST
एकेकाळी लिव्ह इनमध्ये पती-पत्नीप्रमाणे राहणारे कलाकार आज एकमेकांचे कट्टर शत्रू title=

 

मुंबई : झगमगत्या विश्वाचं आकार्षण प्रत्येकाला असतं. कलाकार त्यांचं आयुष्य हवं तसं जगतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यावर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत फिरायला जाणं. एवढंच नाही तर कलाकार लग्ना आणि पती-पत्नीप्रमाणे राहतात. या नात्याला लिव्ह इन रिलेशनशिप असं म्हणतात. सगळ्यांना माहिती आहे की नातं म्हटलं की भांडणं, वाद होतात. त्यामुळे अनेक वर्ष एकत्र राहिलेल्या या जोडप्यांचं ब्रेकअप होतं. असे अनेक कलाकार आहे जे लिव्ह इनमध्ये एकत्र राहिले, पण नातं तुटल्यानंतर आता एकमेकांचं तोंड देखील पाहात नाहीत. 

जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू

जॉन आणि बिपाशा तब्बल 9 वर्ष लिव्ह इनमध्ये राहत होते. पण कालांतराने प्रिया रुंचलने जॉनच्या मनात राज्य केलं. त्यानंतर जॉन आणि बिपाशाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 

सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेता अंकिता लोखंडे अनेक वर्ष एकमेकांच्या प्रेमात होते. दोघे लग्न करणार अशी चर्चा देखील होती. काही कारणामुळे दोघांमध्ये दूरावा निर्माण झाला. यादरम्यान अंकिता डिप्रेशनमध्ये गेली होती. 

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ

रणबीर आणि कतरिना काही वर्ष लिव्ह इनमध्ये राहत होती. पण काही कारणांमुळे त्याच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला. आता रणबीर आलियाला डेट करत आहे, तर दुसरीकडे कतरिना आणि अभिनेता विक्की कौशलच्या नात्याच्या चर्चा रंगत आहेत. 

शाहीद कपूर आणि प्रियंका चोप्रा
शाहीद कपूर आणि प्रियंका चोप्रा ब्रेकअपनंतर त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत. पण आज दोघांना एकमेकांकडे पाहायला देखील आवडत नाही.