'संजू'वर अभिनेते योगेश सोमण संतापले

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारीत असलेला संजू हा सिनेमा सध्या कमाईचे विक्रम मोडत आहे. 

Updated: Jul 2, 2018, 08:24 PM IST
'संजू'वर अभिनेते योगेश सोमण संतापले title=

मुंबई : संजय दत्तच्या आयुष्यावर आधारीत असलेला संजू हा सिनेमा सध्या कमाईचे विक्रम मोडत असला तरी अभिनेते योगेश सोमण यांनी मात्र त्याला विरोध केलाय. योगेश सोमण यांनी आपल्या भावना व्यक्त करणारा व्हिडीओ फेसबूकवर अपलोड केलाय. त्यावरून सोशल मीडियात बऱ्याच चर्चा सुरू आहेत. संजय दत्तचं सिनेमातून उदात्तीकरण करण्यात आल्याचा त्यांचा आक्षेप आहे. संजय दत्तचा न्यायालयीन खटला, त्याच्यावर असलेले आरोप, देशद्रोहाचे गंभीर आरोप यांचीही माहिती आपल्या मुलांना द्या असं आवाहन योगेश सोमण यांनी केलंय. काही दिवसांनी सलमानला ग्लोरिफाय करणारा भाईजान नावाचा सिनेमा आला तरी आश्चर्य वाटायला नको असं सोमण यांनी म्हटलंय.