Vijay Deverakonda ED : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. देवरकोंडाला चौकशीसाठी ईडीने बोलावलं होतं. (Liger Money Laundering Case) आज बुधवारी आठच्या सुमारास देवरकोंडा ईडीच्या कार्यालयात हजर झाला होता. विजय देवरकोंडाचा 'लाईगर' (Vijay Deverakonda ED) बॉलिवूडमधील पहिला चित्रपट होता. या चित्रपट निधीच्या चौकशीबाबत त्याची चौकशी करण्यात आली आहे. याआधी 'लाईगर' सिनेमाचे निर्माता चार्मी कौर यांची चौकशी झाली होती. (Actor Vijay Deverakonda questioned by ED latest marathi entertainment news)
परकीय चलन कायद्याचं (Foreign Exchange Management Act) उल्लंघन केल्याच्या आरोपांवर चौकशी करण्यात आली आहे. 'लाईगर' चित्रपटाचं जवळपास 120 कोटींचं बजेट होतं. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच आपटलेला दिसला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 60.80 लाखांचा गल्ला जमावला.
विजय देवरकोंडा हा साऊथचा मोठा अभिनेता आहे. त्यामुळे विजयच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर किती कमाई होते याची उत्सुकता सर्वांना लागली होती. चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही जोरात खर्च करण्यात आला होता. मात्र प्रेक्षकांना चित्रपट फार काही आवडलेला दिसला नाही.
चित्रपटासाठी विदेशी चलनाचा वापर झाल्याची तक्रार करण्यात आली होती. 17 नोव्हेंबरला चार्मी कौर आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर आज विजयला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.