सोनू सूद पुन्हा चर्चेत, अभिनेत्याने फेडलं ६५ वर्षीय व्यक्तीचं तब्बल इतकं कर्ज

 नुकताच अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा गरजूंना मदत करण्यासाठी पुढे आला असून त्याने त्याची वचनबद्धता सिद्ध केली आहे. सोनू सुद हा अभिनेता फारच लोकप्रिय आहे. तो त्याच्या हटके अभिनयासाठी आणि त्याच्या समाजकार्यासाठी ओळखला जातो. त्याच्या अभिनयानं चाहत्यांना अक्षरक्ष: वेड लावलं आहे. 

सायली कौलगेकर | Updated: Aug 11, 2023, 04:27 PM IST
सोनू सूद पुन्हा चर्चेत, अभिनेत्याने फेडलं ६५ वर्षीय व्यक्तीचं तब्बल इतकं कर्ज  title=

मुंबई :  सोनू सुद हा अभिनेता फारच लोकप्रिय आहे. तो त्याच्या हटके अभिनयासाठी आणि त्याच्या समाजकार्यासाठी ओळखला जातो. त्याच्या अभिनयानं चाहत्यांना अक्षरक्ष: वेड लावलं आहे. त्यामुळे त्याची अनेकदा चर्चा होताना दिसते. कोविड काळात त्यानं अनेक लोकांना आणि कलाकारांना मदत केली आहे. त्यामुळे त्याच्या अभिनयाचं जितकं कौतुक झालं तितकेच किंवा त्याही पेक्षा जास्त कौतुक हे त्याच्या या समाजकार्याचे झाले. सोशल मीडियावरही त्याच्या अभिनयाचे आणि या कामाचं प्रचंड प्रमाणात कौतुक करण्यात आलं होतं.

 नुकताच अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा गरजूंना मदत करण्यासाठी पुढे आला असून त्याने त्याची वचनबद्धता सिद्ध केली आहे. बिहारमधील 65 वर्षीय खिलानंद झा हे नुकतेच सोनू सूद ला यांना भेटण्यासाठी मुंबईत आले होते. संघर्ष आणि आर्थिक ओझ्याने भरलेल्या झा यांच्या मदतीसाठी सोनू सूद पुढे सरसावला आहे. 

खिलानंद झा यांच्या पत्नी मिनोती पासवान यांचं या वर्षाच्या सुरुवातीला पॅरालिसीसच्या झटक्याने निधन झालं त्यामुळे त्यांच्यावर तिच्या वैद्यकीय खर्चासाठी १२ लाखांचं कर्ज होतं. कर्जदारांनी पेमेंट क्लिअरन्सची मागणी केल्यामुळे कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान गरीबांना मदत करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल ऐकल्यानंतर त्याने सोनू सूदची मदत घेतली. 

आशावादाने भरलेले झा, आपल्या मुलासह अलीकडेच सोनू सूदला त्याच्या कार्यालयात भेटले. आपल्या परोपकारी कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याने वृद्ध व्यक्तीच्या परिस्थितीबद्दल सहानुभूती दर्शवली आणि त्याला पाठिंबा देण्यास सहज सहमती दर्शवली. सोनू सूदचा मदतीचा हात अनेकांना मदत करत आला आहे आणि त्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडला आहे.

अलीकडेच, सोनूला पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील अजितवाल गावात एक चांगल्याप्रकारे तयार केली गेलेली विशाल पॉप कला कृतिने गौरविण्यात आलंय. जे 1.17 लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरलं आहे. अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यांच्या प्रयत्नांसाठी टीमचे आभार मानले.

बॉलीवूडमधील कामाच्या आघाडीवर सोनू सूद फतेह या हिंदी चित्रपटात दिसणार आहे.  हा सिनेमा हाय-ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्सने भरलेला असणार आहे. अ‍ॅक्शन-थ्रिलरचे दिग्दर्शन अभिनंदन गुप्ता यांनी केले आहे, ज्यांनी यापूर्वी 'बाजीराव मस्तानी' आणि 'शमशेरा' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.