Sanjay Dutt:'बाबा जास्त झाली?', पत्नीसोबत रॉमेण्टिक डान्स केल्यानं संजय दत्त ट्रोल!

Sanjay Dutt Trolled: या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मान्यता दत्त आणि संजय दत्त एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसत आहेत.

Updated: Feb 11, 2023, 03:18 PM IST
Sanjay Dutt:'बाबा जास्त झाली?', पत्नीसोबत रॉमेण्टिक डान्स केल्यानं संजय दत्त ट्रोल!  title=

Sanjay Dutt Trolled: अभिनेता संजय दत्त हा आपल्या अभिनयानं सगळ्यांचीच मनं जिंकून घेतो. त्याला संजू बाबा म्हणून ओळखणारा त्याचा अख्ख्या चाहता वर्ग मोठा आहे. नुकताच संजय दत्त (Sanjay Dutt) आणि त्याची पत्नी मान्यता दत्त (Manyata Dutt) यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला त्याचा एक व्हिडीओ (Video) त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संजय दत्त आपल्या पत्नीसोबत रॉमॅण्टिक डान्स करताना दिसत आहे. या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. त्यामुळे या व्हिडीओ अनेक जणं संजय दत्तला ट्रोल करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ मान्यता दत्तनं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावर त्या दोघांच्या चाहत्यांना त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या (Anniversary) अनेक शुभेच्छाही दिल्या आहेत. परंतु काहींना मात्र त्यांना खूपच ट्रोल केलं आहे. (actor sanjay dutt gets trolled on dancing with wife manyata dutt netizens reacts)

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मान्यता दत्त आणि संजय दत्त एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसत आहेत. त्यातून संजय दत्त तिला डान्स करताना आपल्याकडे ओढताना दिसतो आहे त्यामुळे संजय दात्त हा दारू पिऊन डान्स करतो आहे की काय यावरून त्याला जोरात ट्रोल केलं आहे. सध्या सगळीकडेच या व्हिडीओचीच चर्चा आहे. आज मान्यता दत्त आणि संजय दत्त यांच्या लग्नाचा 15 वा वाढदिवस आहे. यावेळी त्यांनी पबसारख्या ठिकाणी एकमेकांसोबत वेळ घालवला. यावेळी त्यांनी एक रॉमेण्टिक डान्सही केला. हा डान्स पासून मात्र संजय दत्त ट्रोल झाला आहे. 

त्यांनी यावेळी अमिताभ बच्चन यांच्या 'कालिया' चित्रपटातील 'तुम साथ हो जब अपने' (Tum Saath Ho Jab Aple) या गाण्यावर नाच केला आणि त्यानंतर संजय दत्तचा ऑरा पाहून नेटकरी त्याला ट्रोल करू लागले. मान्यता दत्त ही संजय दत्तची तिसरी पत्नी आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 21 वर्षे झाली आहेत. आम्ही चुका केल्या, आम्ही माफी मागितली, एकमेकांना संधीही दिली, त्याचसोबतच एकमेकांना माफही केलं, आम्ही मज्जा मस्तीही केली, आम्ही खूप ओरडलो एकमेकांवर, आम्ही हिंमंतही ठेवली आणि प्रेमही केलं. तेव्हा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनेकांनी या दोघांच्या डान्सवर नाना तऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. परंतु अनेकांना संजय दत्तचा अंदाज काही फारसा आवडलेला नाही त्यामुळे अनेक जण त्यांना ट्रोल करत आहेत. त्यामुळे संजय दत्तसह मान्यता दत्तही खूप ट्रोल होत आहे.