Confirm... आलिया लवकरच होणार रणबीरची नवरी

चाहत्यांना देखील रणबीर आणि आलियाच्या लग्नाची प्रतिक्षा आहे.  

Updated: Dec 25, 2020, 12:38 PM IST
Confirm... आलिया लवकरच होणार रणबीरची नवरी title=

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नाची चर्चा वाऱ्यासारखी पसरत आहे. चाहत्यांना देखील रणबीर आणि आलियाच्या लग्नाची प्रतिक्षा आहे. याआधी डिसेंबर २०२० च्या अखेरीस रणबीर-आलिया विवाह बंधनात अडकतील असं सांगण्यात येत होतं, परंतु कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्यांचं लग्न होवू शकलं नाही. आता २०२१ वर्षाखेरीस दोघे लग्न बंधनात अडकतील असं सांगण्यात येत आहे. 

एका मुलाखती दरम्यान रणबीरने त्यांच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे, तो म्हणाला, 'जर कोरोना महामारी नसती तर हा करार पूर्ण झाला असता. मी देखील हे ध्येय लवकर पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे.' रणबीरच्या या वक्तव्यानंतर आता भट्ट आणि कपूर कुटुंबात कधी नातं जुळून येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @ranbiraliafanpage

मात्र, जेव्हा आलियाला लग्नाबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा तिने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. 'अनेकदा मला हाच प्रश्न विचारण्यात येतो. मी अद्याप २५ वर्षांची आहे. त्यामुळे आता लग्न केलं तर खूप घाई होईल.' अशी प्रतिक्रिया आलियाने दिली. 

लवकरच आलिया आणि रणबीर 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. 'ब्रम्हास्त्र' शिवाय आलिया 'आरआरआर' आणि ‘गंगूबाई काठियावाड़ी’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.