कुणापासून वेगळं होण्याचं दु:ख व्यक्त करतोय आर. माधवन?

विभक्त होण्याचं दु:ख... 

Updated: Sep 14, 2021, 06:54 AM IST
कुणापासून वेगळं होण्याचं दु:ख व्यक्त करतोय आर. माधवन?  title=
छाया सौजन्य - सोशल मीडिया

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींच्या नात्यांमध्ये वादळ आल्याच्या चर्चा पाहायला मिळत आहे. कधी एकेकाळी प्रेमाच्या आणाभाका घेणारी ही मंडळी अचानकच एकमेकांपासून विभक्त होण्याच्या बातम्या जाहीर करु लागले आहेत. 

चाहत्यांसाठी हा एक धक्काच आहे असं म्हणायला हरकत नाही. अशातच आता अभिनेता आर. माधवन यानंही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मॅडीने लिहिलेलं कॅप्शन काहीतरी भलतंच सुचवत आहे. 

जीवनातील विभक्त होण्याचं दु:ख... असं म्हणत त्यानं एक व्हिडीओ पोस्ट केला. माधवनची पोस्ट पाहताना त्याचं कॅप्शन आधी वाचल्यास नेमकं काय म्हणायचंय हे लक्षात येत नाही आणि लक्षात आलं तरीही विभक्त होण्याच्या गोष्टी माधवन का करतोय असाच प्रश्न मनात घर करतो. पण, प्रत्यक्षात मात्र त्यानं पोस्ट केलेल्या व्हिडीओतून सारं काही उलगडत आहे. 

अतिशय विनोदी व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एक मालवाहू ट्रक रस्त्यावरुन येत असताना अती ओझं झाल्यामुळे या ट्रकच्या वरचा भाग रस्त्याच्या एका बाजुला झुकतो आणि काही कळण्याच्या आधीच तो ट्रकच्या चाकांपासून वेगळा होऊन मध्येच पडतो आणि चाकांचा भाग पुढे निघून जातो, असं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

विभक्त होण्याची ही अजब पद्धत पाहून नेटकऱ्यांमध्येही एकच हशा पिकत आहे.