या प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप, मेडिकल रिपोर्ट पॉझिटिव्ह

‘देवों के देव महादेव’ या मालिकेत भगवान रामची भूमिका साकारणारा पीयूष सहदेव याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. रिपोर्टनुसार, पीयूषचा मेडिकल रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पीयूष या आरोपात दोषी ठरवला जाऊ शकतो. 

Updated: Dec 14, 2017, 03:12 PM IST
या प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप, मेडिकल रिपोर्ट पॉझिटिव्ह title=

मुंबई : ‘देवों के देव महादेव’ या मालिकेत भगवान रामची भूमिका साकारणारा पीयूष सहदेव याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. रिपोर्टनुसार, पीयूषचा मेडिकल रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पीयूष या आरोपात दोषी ठरवला जाऊ शकतो. 

काय आहे प्रकरण?

टेली चक्करच्या एका रिपोर्टनुसार, सोनी टीव्हीवर ‘बेहद’ मालिकेत समयची भूमिका साकारणा-या पीयूषवर लावण्यात आलेले आरोप मेडिकल रिपोर्टमध्ये सिद्ध झाले आहेत. पीयूषला गेल्या आठवड्यात ‘सप ने सुहाने लडकपन के’च्या अभिनेत्रीसोबत लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली होती. जामिन नाकारण्यात आल्याने पीयूष अजूनही मुंबईतील आर्थर रोड तुरूंगात आहे. अजूनही त्याची चौकशी सुरू आहे.  

काय म्हणणं आहे त्याच्या बहिणीचं?

पीयूषची बहिण मेहर विजने एका वृत्तपत्राला सांगितले की, ‘जेव्हापासून पीयूषचं लग्न झालं, तेव्हापासून आम्ही संपर्कात नाही आहोत. त्याच्या पत्नीला काही अडचणी होत्या त्यामुळे आम्ही त्यांच्यात कधी ढवळाढवळ केली नाही. मेहरने सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ सिनेमात बालकलाकार हर्षाली मल्होत्राच्या आईची भूमिका साकारली होती. तर तिने सीक्रेट सुपरस्टारमध्येही महत्वाची भूमिका साकारली. 

पीयूषच्या आधीच्या पत्नीचं म्हणणं...

पीयूषच्या एक्स वाईफ म्हणनं आहे की, ‘मी गेल्या चार महिन्यांपासून पीयूषच्या संपर्कात नाहीये. आम्ही सहा महिन्यांपूर्वीच वेगळे झालोत. त्यामुळे मला काहीच माहिती नाही की, ही बातमी खरी आहे की खोटी’.