... तर जीवाचं बरंवाईट केलं असतं; मुलंबाळं असताना अभिनेत्याच्या मनात हा विचार का आला?

परिस्थितीमध्ये इतकी ताकद आहे की... 

Updated: Mar 16, 2022, 10:25 AM IST
... तर जीवाचं बरंवाईट केलं असतं; मुलंबाळं असताना अभिनेत्याच्या मनात हा विचार का आला?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : मी कोणापुढे नमत नाही, असं म्हणणारे अनेकजण परिस्थितीपुढे मात्र हतबल होताना दिसतात. परिस्थितीमध्ये इतकी ताकद आहे की, ती तुम्हाला जितके चांगले दिवस दाखवते तितकीच वाईट दिवसांत तुम्हाला नाक घासण्यासही भाग पाडते. 

अगदी श्रीमंतांपासून गरीबापर्यंत कोणी परिस्थितीपुढे नमलं नाही, असं फार क्वचितच घडलं असावं. 

अचानकच परिस्थितीविषयी बोलण्यामागचं कारण म्हणजे, अभिनेता करणवीर बोहरा. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं करणवीरनं त्याच्या खासगी आयुष्याशी संबंधित हा मोठा उलगडा केला. (Karanveer Bohra)

सात वर्षांपासून तो कोणत्या परिस्थितीशी झुंज देतोय ? 
करणवीरनं एका रिअॅलिटी शोमध्ये आपल्या करिअरमधील गेल्या सात वर्षांतील काळ आठवला. आपण कर्जबाजारी असल्याचं सांगत याशिवाय आपल्यावर 3-4 खटलेही सुरु असल्याचं त्यानं सांगितलं. 

पैसे परत न करु शकल्यामुळं करणवीरविरोधात काहींनी खटला चालवला आहे. 'मी संपूर्णपणे कर्जबाजारी झालो आहे. मी असा अडकलोय की या खड्ड्यातून माझं डोकंही बाहेर नाहीये. पैसे न परत केल्यामुळं माझ्याविरोधात 3-4 खटलेही सुरु आहेत. 

2015 पासून आतापर्यंत मी जे काही कामकेलं, ते फक्त हे कर्ज फेडण्यासाठीच केलं', असं म्हणत मला स्वत:साठी आणि कुटुंबासाठी प्रचंड दु:ख वाटत असल्याचंही तो म्हणाला. 

कुटुंबाला आपल्यामुळं यातना होत असल्याचं म्हणत माझ्या जागी कोणी दुसरं असतं तर त्यानं जीव संपवला असता, अशी हतबलता त्यानं व्यक्त केली. 

हा रिअॅलिटी शो माझ्यासाठी एक आशेचा किरण असल्याचं म्हणत करणवीरनं त्याचा जगण्याचा संघर्ष सर्वांसमोर मांडला. 

सतत कॅमेरासमोर असताना करणवीरचा उत्साह आणि एकंदर वावरणं पाहता तो खरंच इतक्या आव्हानांना तोंड देत असेल याची पुसटशी कल्पनाही चाहत्यांना आली नव्हती. पण, आता जेव्हा त्याची परिस्थिती सर्वांसमोर आली तेव्हा अनेकांनीच चिंतेचा सूर आळवला.