पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बॉलिवूडची ऑफर, प्रसिद्ध अभिनेत्याने हे काय केलं?

त्यांच्या रिलेशनशीपबाबतचे किस्से सोशल मीडियावर खूप गाजत असत. 

Updated: Mar 14, 2022, 04:43 PM IST
  पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बॉलिवूडची ऑफर, प्रसिद्ध अभिनेत्याने हे काय केलं? title=

मुंबई : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची गणना क्रिकेट जगतातील अष्टपैलू खेळाडू अशी केली जाते. इम्रान खान जेव्हा पाकिस्तानचे कर्णधार झाले तेव्हा त्यांनी पाकिस्तानला पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला. इम्रान खान यांच्यावर लाखो सौंदर्यवती फिदा होत्या असं बोललं जायचं. त्यांच्या रिलेशनशीपबाबतचे किस्से सोशल मीडियावर खूप गाजत असत. 

क्रिकेट जगताचा निरोप घेतल्यानंतर इम्रान खान थेट पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसले. सर्वात देखणा क्रिकेटपटूंपैकी एक असलेले इम्रान त्यांच्या लूकमुळेही चर्चेत होते.

बॉलिवूड अभिनेता देवानंद यांनी इम्रान यांच्या लूकचा विचार करून चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. आणि याचा खुलासा खुद्द इम्रान खान यांनी 2006 मध्ये एका मुलाखतीत केला होता. 

जेव्हा एका पत्रकाराने इम्रान यांना विचारले की, तुम्ही बॉलिवूड का जॉईन करत नाहीत? तर इम्रान खानने प्रत्युत्तर देत म्हटले की, भारतातील एका मोठ्या अभिनेत्याने मला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

यासाठी ते इंग्लंडमध्येही आले होते... यादरम्यान इम्रान खान प्रेक्षकांसमोर या अभिनेत्याचे नाव सांगत नव्हते, पण जेव्हा प्रेक्षक आणि पत्रकाराने त्यांच्यासमोर त्या अभिनेत्याचे नाव सांगण्याचा आग्रह धरला. तेव्हा इम्रान यांनी देवानंद यांचे नाव घेतले.

या मुलाखतीत बोलताना इम्रान पुढे म्हणाले- "त्यांचे नाव देवानंद साहब होते, पण माझ्यासाठी हे आश्चर्यकारक होते कारण मी विचार करत होतो की मी क्रिकेट खेळतो, मग मी अभिनेता कसा बनू, त्यामुळे याला काही अर्थ नाही."

जेव्हा ही गोष्ट सगळीकडे पसरली तेव्हा याबाबत बरीच चर्चा झाली. आणि अनेकांनी यावर आपली बाजू मांडायला सुरु केली.