'एक आम हिंदुस्तानी को मुसलमान कर दिया'; अभिनेत्याचं बोचरं ट्विट

सोशल मीडियावर आपली मतं परखडपणे मांडणाऱ्या... 

Updated: Dec 14, 2019, 07:07 PM IST
'एक आम हिंदुस्तानी को मुसलमान कर दिया'; अभिनेत्याचं बोचरं ट्विट title=
छाया सौजन्य- ट्विटर

मुंबई : देशात सध्याच्या घडीला नुकत्याच लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावर अनेकांनीच व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. एकिकडे या कायद्याचं स्वागत करणारा वर्ग आहे, तर दुसरीकडे या कायद्याच्या विरोधात आवाज उठवणारी मंडळीही आहेत. या साऱ्यामध्येच आता एका अभिनेत्याचं ट्विटही बरंच चर्चेत आलं आहे. 

'एक आम हिंदुस्तानी को मुसलमान कर दिया', अशा काव्यपंक्ती पोस्ट करणारा तो अभिनेता म्हणजे जावेद जाफरी. नृत्य आणि अभिनय क्षेत्रात नावाजलेल्या जावेद जाफरीने सोशल मीडियावर एक कविता पोस्ट केली आहे. 'श्रद्धांजली', असं लिहित त्याने या काव्यपंक्ती पोस्ट केल्या आहेत. 

Image result for javed jaffrey UPSET

इस्लामी नाम, नमाजी बाप, 
खुदा का ताब, जो कर ना सका.... 
एक कागज के पुर्जे ने वो काम कर दिया, 
एक आम हिंदुस्तानी को मुसलमान कर दिया.

अशी कौसर मुनीर यांची कविता जावेदने पोस्ट केली. मुळात सोशल मीडियावर आपली मतं परखडपणे मांडणाऱ्या जावेदने कुठेच नागरिकत्व सुधारणा कायद्याचा उल्लेखही केलेला नाही. पण, सद्यस्थिती आणि त्याचं हे ट्विट पाहता त्याच्या या ट्विटचा रोख नेमका कोणत्या दिशेने आहे याचा अंदाज अनेकांनीच लावण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या या शाब्दिक फटकेबाजीवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 

काय आहे नागरिकत्व सुधारणा कायदा? 

मोदी सरकारकडून सादर करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तानमधून भारतात येणाऱ्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन लोकांना नागरिकत्व देण्यासाठी बदल करण्यात आले आहेत. भारतात शरण घेतलेल्या या धर्माच्या लोकांना घुसखोर मानलं जाणार नाही. 

श्रीलंकेतील तामिळ, पाकिस्तान मुस्लीम आणि अन्य समुदायातील व्यक्ती तसंच म्यानमारमधील मुस्लीम यांना या कायद्याचा लाभ मिळणार नाही आहे.