'गड्या, घोटाळे सुटायला....'; एकाएकी भरत जाधव असं का म्हणतोय?

भरत आला परत.... महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला हा अभिनेता एकाएकी असं का म्हणतोय? त्याचे शब्द सर्वांच्याच नजरा वळवणारे... 

Updated: Oct 13, 2022, 03:04 PM IST
'गड्या, घोटाळे सुटायला....'; एकाएकी भरत जाधव असं का म्हणतोय?  title=
Actor bharat jadhav shares a post as bakula namdev ghotale movie completes 15 years

Bharat Jadhav : एकांकिका, व्यावसायिक नाटक, चित्रपट किंवा मालिका... प्रत्येक माध्यमातून आपलं कौशल्य दाखवत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा एक अभिनेता म्हणजे भरत जाधव. एक अभिनेता असण्यासोबतच त्यानं निर्मितीमध्येही नशिब आजमावलं. काही कलाकार समोर आले तरी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा पाहायला मिळते. भरत जाधव म्हणजे त्यातलंच एक नाव. विविध धाटणीच्या, विशेष म्हणजे विनोदी चित्रपटांतून या अभिनेत्यानं सबंध महाराष्ट्राच्या घरातच स्थान मिळवलं. (Actor bharat jadhav shares a post as bakula namdev ghotale movie completes 15 years)

काही संवेदनशील मुद्द्यांवरही मार्मिकपणे भाष्य करण्याची कला भरत जाधवला चांगलीच जमते. अशा या अभिनेत्याला केदार शिंदे (Kedar Shinde) नावाच्या मित्राची आणि तितक्याच अष्टपैलू दिग्दर्शकाची साथ लाभली आणि या जोडीनं किमयाच केली. याच मित्रांच्या जोडीनं मिळून एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता, ज्यामध्ये भरत खलनायकी भूमिकेत दिसला. 

अधिक वाचा : जगभरात गाजलेल्या 'या' महिला DJ ला अत्याचार करुन जीवे मारण्याची धमकी

हा चित्रपट म्हणजे, 'बकुळा नामदेव घोटाळे' (Bakula Namdev Ghotale). सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून भरतनं साकारलेली भूमिका आजही अनेकांच्या आवडीची. हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास 15 वर्षे उलटली, त्यानिमित्त खुद्द 'सरपंच घोटाळे', म्हणजेच भरतनं एक पोस्ट लिहिली. ज्यामध्ये त्यानं हा घोटाळे सुरुवातीला अनेकांना भावला नव्हता असा गौप्यस्फोट केला. आज मात्र चित्र बदललं आहे. घोटाळेचा घोटाळेबाज स्वभाव प्रेक्षकांनीही उचलून धरत त्याला पसंती दिल्याचं पाहून समाधान वाटतं असं भरत त्याच्या पोस्टमध्ये लिहितो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

'१५ वर्ष झाली.... आता घोटाळे सुटायला पाहिजे गड्या...भकासपूर वाट पाहतोय..!!!', असंही त्यानं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्याचा एकंदर सूर पाहता आता भकासपूर, तिथले एकाहून एक गावकरी आणि हा घोटाळे प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येणार का? हाच प्रश्न चाहत्यांना पडू लागला आहे. तुम्हाला आवडेल का सरपंच घोटाळेंना पुन्हा भेटायला?