अनुपम खेरच्या फिल्मचा पॉर्न साईटवर धूमाकूळ!

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांचा एक सिनेमा सध्या भलताच चर्चेत आहे. 

Updated: Dec 28, 2017, 08:53 PM IST
अनुपम खेरच्या फिल्मचा पॉर्न साईटवर धूमाकूळ! title=

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांचा एक सिनेमा सध्या भलताच चर्चेत आहे. 

हॉलिवूड सिनेमा 'द बिग सिक'ला कुणीतरी पॉर्न साईट 'पॉर्नहब'वर अपलोड केलाय. या सिनेमात अनुपम खेर यांची महत्त्वाची भूमिका आहे. हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. सध्या हा सिनेमा पॉर्न वेबसाईटवर धुमाकूळ घालतोय. 

या सिनेमातील अभिनेता कुमैल नान्जियानी यानं सोशल मीडियावर ही माहिती दिलीय. 'ज्यांना हा सिनेमा संपूर्ण कुटुंबासोबत पाहायचाय आणि त्यांच्याकडे अमेझॉनचं सबस्क्रिप्शन नाही ते हा विकत घेऊ शकत नाहीत. तर हा सिनेमा पोर्नहबवर उपलब्ध आहे. फक्त हे मला कसं माहीत आहे? असा प्रश्न विचारू नका... आणि ही मस्करी नाही' असं ट्विट त्यांनं केलंय. 

त्याच्या या ट्विटवर 'पॉर्न वेबसाईट'नंही प्रतिक्रिया व्यक्त केली. 'आम्ही हा सिनेमा हटवण्याचा प्रयत्न करतोय, पण अयशस्वी ठरतोय' असं पॉर्नहबनं म्हटलं. यानंतर कुमैलनं पुन्हा ही फिल्म पॉर्नहबवरून हटवण्यात यावी, अशी इच्छा नसल्याचं म्हटलंय.