लॉकडाऊनमध्ये अरूण गवळीची मुलगी विवाहबंधनात अडकणार

उद्या अडकणार बंधनात 

Updated: May 7, 2020, 09:20 PM IST
लॉकडाऊनमध्ये अरूण गवळीची मुलगी विवाहबंधनात अडकणार  title=

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. अचानक घोषित झालेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांची अनेक काम खोळंबली. यामध्ये अनेक लग्नसमारंभांचा समावेश आहे. हे लॉकडाऊन दिवसेंदिवस वाढत चाललं असताना अनेकांनी यामध्येच अगदी साध्यापद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. असाच निर्णय अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता अरूण गवळीने घेतला आहे. 

८ मे रोजी अरूण गवळीची कन्या योगिता आणि अभिनेता अक्षय वाघमारे विवाहबंधनात अडकणार आहे. मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच हा सोहळा पार पडणार आहे. लग्नाला अगदी १५ ते २० नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. 

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर लग्नाची घोषणा या लॉकडाऊनमध्ये करण्यात आळी. योगिताला आज संध्याकाळी हळद लागली असून अक्षयने देखील हातावर मेहंदी लावली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

मेहंदी  #weddingvibes #thank #you #punepolice #mumbaipolice #quartinewedding

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare) on

डॉन अरुण गवळी सध्या पॅरोलवर बाहेर आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याने अनेक गरजू कुटुंबाना मदतीचा हात दिला. दगडी चाळीत अनेक कुटुंबांना त्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते.

लॉकअपमधून बाहेर पडलेला अरुण गवळी लॉकडाऊनमध्ये घरी अडकला आहे. काही आठवड्यापूर्वी कॅरम खेळतानाचा त्याचा व्हिडीओ जावई अक्षय वाघमारेने सोशल मीडियावर शेअर केला होता.