यश मिळवण्यासाठी त्यांची कथा माझ्यापेक्षा मोठी - कंगणा रानौत

कंगणा 'जया' चित्रपटात तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललीतांचे व्यक्तिमत्व साकारणार आहे.

Updated: Mar 26, 2019, 12:15 PM IST
यश मिळवण्यासाठी त्यांची कथा माझ्यापेक्षा मोठी - कंगणा रानौत title=

मुंबई : अभिनेत्री कंगणा रानौत सध्या चांगलीच चर्चेत आहे. कंगणा लवकरच एक वेगळी भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर कंगणा 'जया' चित्रपटात तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललीतांचे व्यक्तिमत्व साकारणार आहे. शनिवारी कगंणाने तिचा वाढदिवस साजरा केला आहे. कंगणाने 32 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यावेळेस तिने माध्यमांसोबत संवाद साधला. तिला प्रादेशिक चित्रपट करण्यामध्ये रस असल्याचे तिने सांगितले.

कंगणा म्हणाली, 'मला प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम करायला आवडते. कारण जेव्हा मी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू मध्ये जाते तेव्हा तेथील स्थानिक नागरिक फक्त स्थानिक पातळीवर साकारण्यात आलेल्या चित्रपटांना जास्त महत्व देतात. त्यामुळे हा देशातील एक वेगळा भाग आहे. मी या भागात काम करण्यासाठी एका चांगल्या संधीची प्रतिक्षा करत होती. मी माझ्या आयुष्यावर आधारित चित्रपटावर काम करत होती. पण जयललीता आणि माझे आयुष्या मिळते - जुळते आहे. खरं तर, यश मिळवण्यासाठी त्यांची कथा माझ्यापेक्षा मोठी आहे.'
 
चित्रपट दोन भाषांमध्ये चित्रित करण्यात येणार आहे. चित्रपटाचे नाव तामिळमधून 'थलाईवा' तर हिंदीमधून 'जया' असे ठरविण्यात आले आहे. चित्रपटासाठी कंगणा चक्क 24 कोटी रूपयांचे मानधन स्वीकारणार आहे. कंगणा देशातील सर्वात जास्त मानधन स्वीकारणारी अभिनत्री ठरली आहे. कंगणा लवकरच तिचा आगामी 'मेंटल है क्या' चित्रपटात अभिनेता राजकुमार रावसह झळकणार आहे. 
 
जयललीतांनी चित्रपटात त्याचप्रमाणे राजकारणात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांनी तमिळ, तेलगू, कन्नड चित्रपटांमध्ये अनेक भूमिका बजावल्या आहेत. अभिनयासोबतच त्यांनी 1991 ते 2016 पर्यंत तामिळनाडूत मुख्यमंत्री पद भुषविले आहे.