'इस देश मैं हम कुछ भी कर सकते हैं...' अभिषेक बच्चनच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

'बिग बुल' सिनेमाच्या माध्यमातून अभिषेक बच्चन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

Updated: Mar 19, 2021, 01:50 PM IST
'इस देश मैं हम कुछ भी कर सकते हैं...' अभिषेक बच्चनच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित title=

मुंबई : कोरोना महामारीनंतर आता मोठे  सिनेमे रूपेरी पडद्यावर दाखल होत आहे. आता अभिनेता अभिषेक  बच्चनच्या आगामी 'बिग बुल' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात अभिषेकचा एक नवा अंदाज चाहत्यांना पाहता येणार आहे. 'बिग बुल' सिनेमाची कथा इंडियन स्टॉक ब्रोकर हर्षद मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे. जगातील  सर्वात श्रीमंत माणूस होण्याचा ध्यय असणारा अभिषेक त्याच्या स्पप्न पूर्तीसाठी किती योजना आखतो आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं  या ट्रेलरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच ट्रेलरला चाहत्यांनी  भरभरून  प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत ट्रेलरला लाखोंपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर देखील ट्रेलरबद्दल चर्चा सुरू आहे.  सिनेमात अभिषेकसोबत अभिनेत्री इलियाना डिक्रूज देखील मुख्य भुमिकेत दिसणार आहे. 

सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स कूकी गुलाटी यांच्या खांद्यावर आहे. तर अभिनेता अजय देवगन आणि आनंद पंडीत सिनेमाची निर्मिती सांभळणार आहे. 'बिग बुल' सिनेमा 8 एप्रिल रोजी ओनलाईन प्लाटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.