स्टारकिड असूनही चारचौघात अभिषेक बच्चनवर 'ती' वेळ का आली?

आजही अभिषेकच्या मनात ही कटू भावना 

Updated: Dec 20, 2021, 09:04 AM IST
स्टारकिड असूनही चारचौघात अभिषेक बच्चनवर 'ती' वेळ का आली? title=

मुंबई : स्टारकिड असूनही अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) ला सिनेसृष्टीत अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. अभिषेक आपल्या प्रत्येक सिनेमात उत्तम अभिनय करतो. अस असूनही त्याला अपेक्षित असं यश मिळालेलं नाही. कायमच त्याची तुलना महानायक आणि त्याचे वडिल अमिताभ बच्चन यांच्यासोबत झाली. असाच एक अनुभव अभिषेकने शेअर केलाय. 

भर कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी अभिनेता अभिषेकला अपमानित व्हावं लागलं. त्याला पहिल्या रांगेतून उठून मागे बसावं लागलं. स्वतः अभिषेकने हा किस्सा सांगितला आहे. 

भर कार्यक्रमात मोठ्या समारंभात अभिषेक बच्चन पहिल्या रांगेत बसला होता. त्याला एका मोठ्या अभिनेत्यामुळे पहिल्या रांगेतून आपली सीट सोडून मागे जावं लागलं. 

सिनेमातून काढण्यात आलं 

अभिषेक बच्चनने नुकत्याच झालेल्या काही भेदभावाबद्दल सांगितले. अभिषेक सांगतो त्याला अनेक वेळा चित्रपटांमधून काढून टाकले गेले. अभिनेता असूनही त्याला योग्य न्याय मिळाला नाही. 

अभिषेकने रोलिंग स्टोन्स इंडियाला सांगितले, 'एकदा मला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि मला सांगितलेही नाही आणि जेव्हा मी शूटिंगला गेलो तेव्हा मी दुसरेच पाहिले. दुसरा अभिनेता माझा सीन शूट करत आहे.

मी पुन्हा तिथून निघालो. मला चित्रपटांमधून बाहेर फेकले गेले आणि लोकांनी माझा फोन उचलला नाही आणि मला वाटते की हे सामान्य आहे, प्रत्येक अभिनेत्याला या टप्प्यातून जावे लागते. माझ्या वडिलांनीही असे दिवस पाहिले आहेत.

पहिल्या रांगेतून उठवण्यात आलं 

अभिषेक बच्चन पुढे म्हणाला, 'माझ्यासोबत असेही घडले आहे की, जेव्हा मी एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि मला सांगितले जाते की तू पुढच्या रांगेत बसशील. पण एक मोठा स्टार येताच मला उठून मागच्या रांगेत बसण्यास सांगण्यात आले. 

हा सर्व शोबिझचा भाग आहे. आपण हे सर्व वैयक्तिकरित्या घेऊ शकत नाही. तुम्ही फक्त घरी परत या आणि झोपण्यापूर्वी स्वतःशी वचन द्या की, मी आता खूप मेहनत करेन. मी त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी होईन आणि मग मला पुढच्या रांगेतून उठवून मागे बसवले जाणार नाही.

अभिषेकचे सिनेमे

अभिषेक बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अभिनेता अलीकडेच क्राइम-थ्रिलर 'बॉब बिस्वास' मध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसला. जो 2012 च्या 'कहानी' चित्रपटाचा स्पिन-ऑफ आहे. या चित्रपटातील अभिषेकच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. यापूर्वी अभिनेता 'द बिग बुल', 'लुडो' आणि 'मनमर्जियां'चा भाग होता, जिथे त्याच्या परिपक्व अभिनयासाठी त्याचे कौतुक झाले होते.