रितेश देशमुखचा मोठा गौप्यस्फोट; अभिषेक बच्चनवर चोरीचा आरोप

रितेशने अभिषेकवर मोठा आरोप केला आहे.

Updated: Aug 9, 2022, 12:01 AM IST
रितेश देशमुखचा मोठा गौप्यस्फोट; अभिषेक बच्चनवर चोरीचा आरोप title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन रितेश देशमुखच्या 'केस तो बना है' या कॉमेडी शोमध्ये दिसणार आहे. नुकताच या शोचा ट्रेलर रिलीज झाला. शोमध्ये सेलेब्सना त्यांच्यावरील आरोपांना उत्तर द्यायचं आहे. त्याचवेळी रितेशने अभिषेकला अनेक मजेशीर प्रश्न विचारले.

रितेशने अभिषेकला विचारलं, 'तुम्ही चित्रपटांच्या सेटवरून खूप प्रॉप्स चोरता. 'गुरू' सिनेमाच्या सेटवर त्याने आणि त्यानंतर ट्रेलर तिथेच कट होतो. उत्तरात अभिषेक गमतीने म्हणतो, 'मी हिरोईन ऐश्वर्या राय बच्चन चोरली'. अभिषेकने 'गुरु' चित्रपट रिलीज झाल्यानंतरच ऐश्वर्याशी लग्न केलं. अभिषेक व्यतिरिक्त विकी कौशल, पंकज त्रिपाठी, शाहिद कपूर, संजय दत्त असे अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये दिसणार आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अभिषेक बच्चनचा 'दसवी' हा सिनेमा काहि दिवसांपुर्वी रिलीज झाला होता. ज्यामध्ये यामी गौतम आणि निम्रत कौर देखील होत्या. तुषार जलोटा दिग्दर्शित हा चित्रपट एप्रिल २०२२ ला प्रदर्शित होणार आहे.