अभिषेक बच्चनला केले ट्रोल ; दिले सडेतोड उत्तर

बॉलिवूड सेलिब्रेटींना सोशल मीडियावर ट्रोल होणे काही नवीन नाही.

Updated: Apr 18, 2018, 05:24 PM IST
अभिषेक बच्चनला केले ट्रोल ; दिले सडेतोड उत्तर title=

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रेटींना सोशल मीडियावर ट्रोल होणे काही नवीन नाही. मात्र या ट्रोलिंगला सेलिब्रेटी सडेतोड उत्तरं देतात. असेच काहीसे बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने केले. त्याला ट्रोल करणाऱ्या युजर्सेना त्याचे जबरदस्‍त उत्तर दिले.  सोशल मीडियावर एका युजरने आयुष्याच्या तत्त्वज्ञान सांगताना अभिनेता अभिषेक बच्चनला टॅग केले. मात्र त्याच्या या पराक्रमाचे त्याला इतके सडेतोड उत्तर मिळेल, असा विचारही त्याने केला नसेल.

अभिषेक बच्चनचे सडतोड उत्तर

या युजरने लिहिले की, तुमच्या आयुष्याबद्दल वाईट विचार करु नका. अभिषेक बच्चन अजूनही त्याच्या आई वडिलांबरोबरच राहतो. यावर उत्तर देताना अभिषेकने लिहिले की, हो, आणि ही माझ्यासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट आहे. मी आजही त्यांच्यासाठी प्रत्येक वेळेस उभा असेन, जसे ते माझ्यासाठी आहेत. अभिषेक बच्चन त्याच्या आई वडिलांबरोबर पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्यासोबत जलसातच राहतो.

काही वेळेस लोकांना त्यांची जागा दाखवणे गरजेचे

यावर एका युजरने विचारले की, अशा ट्वीट्सना तुम्ही उत्तर का देता? त्यावर अभिषेक म्हणाला की, कधी कधी अशा लोकांना त्यांची जागा दाखवण्याची गरज असते. असे पहिल्यांदाच होत नाहीये. यापूर्वीही अभिषेकने ट्रोलर्संना जबरदस्त उत्तरे दिली आहेत. आपल्या मुलीबद्दल, पत्नीबद्दल विचित्र कमेंट करणाऱ्यांना अभिषेकने आपल्या उत्तरातून त्यांची जागा दाखवून दिली आहे. 

या सिनेमातून अभिषेक प्रेक्षकांच्या भेटीला

हाऊसफूल ३ नंतर आता अभिषेक बच्चन मनमर्जिया या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येईल. या सिनेमात तापसी पन्नू आणि विक्की कौशल देखील आहेत.