कल्याण आणि सातारा मतदार संघातून अभिजीत बिचुकलेला मिळाली 'इतकी' मतं

Abhijit Bichukale Lok Sabha Elections : अभिजीत बिचुकलेला कल्याण आणि सातारा मतदार संघातून किती मतं मिळाली माहितीयेत?

दिक्षा पाटील | Updated: Jun 4, 2024, 07:59 PM IST
कल्याण आणि सातारा मतदार संघातून अभिजीत बिचुकलेला मिळाली 'इतकी' मतं title=
(Photo Credit : Social Media)

Abhijit Bichukale Lok Sabha Elections : सध्या सगळीकडे लोकसभा निवडणूकीची चर्चा सुरु आहे. कोणी कुठे बाजी मारली हे सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं. तर दुसरीकडे या सगळ्यात सगळ्यांचं लक्ष हे साताऱ्याच्या या अभिजीत बिचुकलेनं वेधलं आहे. अभिजीतनं सगळ्यांच्या मनात स्वत: चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तर त्यानं देखील यावेळी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर तो दोन ठिकाणांहून उभा राहिला होता. त्यात एक म्हणजे कल्याण-डोंबिवली आणि दुसरं सातारा. त्यामुळे आता अभिजीतला एकूण किती मत मिळाले ते जाणून घेऊया.

आज सकाळपासून मतमोजणी सुरु झाली आहे. आता शेवटच्या टप्प्यात झालेल्या मतमोजणी दरम्यान, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे या विद्यमान खासदारांची प्रतिष्ठाही पणाला लागली होती. पण आता या मतदार संघाचा निकाल समोर आला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विशेष श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या गटातून उमेदवार म्हणून वैशाली दरेकर उभ्या होत्या. पण त्या दोघांची चर्चा एकीकडे सुरु असताना दुसरीकडे चर्चा ही अभिजीत बिचुकलेची सुरु आहे. अभिजीत बिचुकले यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढत होता. 

अभिजीत बिचूकलेला किती मिळाली मतं

अभिजीत बिचकूलेला कल्याण मतदार संघातून 1808 मत मिळाली आहेत. बिचुकलेनं या व्यतिरिक्त साताऱ्यातून देखील निवडणूकीचा अर्ज भरला होता. तिथून त्याला 1395 मत मिळाली. तर साताऱ्यातून उदयनराजे भोसले विजयी ठरले आहेत. 

हेही वाचा : आता खासदार कंगना रणौत म्हणा; लोकसभा जिंकताच म्हणाली- 'माझा विजय हा सनातनचा विजय!'

दरम्यान, अभिजीत बिचुकले यांनी आजवर अनेक निवडणुक लढवल्या आहेत. अभिजीतनं सोशल मीडियावर आजवर अनेक स्टंट केले. तो नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत राहतो. आजवर अनेक निवडणूक लढवल्या असल्या तरी अभिजीत बिचुकले याला आजवर यश मिळालेलं नाही.