लग्नाच्या 4 महिन्यातच गोविंदाच्या भाचीचा घटस्फोट? संतप्त अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली...

Aarti Singh Divorce : गोविंदाच्या भाचीचा लग्नाच्या 4 महिन्यातच होणार घटस्फोट! 

दिक्षा पाटील | Updated: Aug 31, 2024, 12:39 PM IST
लग्नाच्या 4 महिन्यातच गोविंदाच्या भाचीचा घटस्फोट? संतप्त अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली... title=
(Photo Credit : Social Media)

Aarti Singh Divorce : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आणि कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंगच्या लग्नाला 4 महिने झाले आहेत. इतक्यात तिच्या आणि तिचा नवरा दीपक चौहानच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आता अभिनेत्री आरतीनं या सगळ्या अफवांवर सडेतोड उत्तर दिले आहे. तिनं म्हटलं की नाव ठेवणाऱ्यांना फक्त तेच काम आहे. आपण आपलं आयुष्य जगत राहायचं. जे लोकं अशा चर्चा करतात, त्यांचं काही अस्तित्व नसतं. 

आरती सिंगनं या सगळ्या अफवांवर उत्तर देत सांगितलं की इन्स्टंट बॉलिवूडला सांगितलं की या सगळ्या गोष्टी पोर्टल करतात, त्यांचं काही अस्तित्व नाही. त्यांना काहीही वायफळ बोलायला आवडतं. ते म्हणतात की नाव ठेवणाऱ्यांना फक्त तेच काम आहे. आपण आपलं आयुष्य जगत राहायचं. 

Aarti Singh divorce after 4 months of wedding actress react on it

आरती आणि दिपक चौहान 25 एप्रिल 2024 ला मुंबईत गाजावाजात लग्न केलं. लग्नानंतर दोघं परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी हनीमूनला फिरायला गेले. आरती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिनं नुकताच लग्नातील एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात सांगितलं की तिचं आणि दीपकचं अरेंज मॅरेज आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीनं खुलासा केला की त्यांनी नोव्हेंबर 2023 शी लग्न केलं. आरतीनं सांगितलं की दीपक दिल्लीमध्ये त्यांच्या गुरुजींच्या मंदिरात अंगठी घेऊ आला होता आणि तिला लग्नासाठी प्रपोज केलं. तर आरतीनं लगेच त्याला होकार दिला. दीपक हा बिझनेसमॅन असून नवी मुंबईत स्थायिक आहे. 

हेही वाचा : लग्झरी कार कंपनीवर संतापली अभिनेत्री! 50 कोटींचा खटला दाखल करत म्हणाली 'माझा मानसिक छळ...'

आरती सिंगविषयी बोलायचं झालं तर तिनं आजवर 'मायका', 'गृहस्थी', 'उतरन', 'उडान', 'परिचय', 'ससुराल सिमर का', 'देवों के देव...महादेव' आणि 'वारिस' सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 2019 मध्ये ती 'बिग बॉस 13' मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. तर या शोची ती चौथी रनर-अप ठरली होती. या शोमध्ये आरतीनं हा देखील खुलासा केला की तो जवळपास 2 वर्षांपर्यंत कामाच्या कमीमुळे डिप्रेशनमध्ये होती.