'मी निःशब्द...', आमिर खानकडून नागराजच्या 'झुंड'चं कौतुक

नागराजच्या मराठी सिनेमात आमिर खानला करायचंय काम

Updated: Mar 2, 2022, 12:13 PM IST
 'मी निःशब्द...', आमिर खानकडून नागराजच्या 'झुंड'चं कौतुक  title=

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळेने (Nagraj Manjule) सिनेसृष्टीला सर्वोत्तम सिनेमे दिले. आता नागराज बॉलिवूडमध्ये आपला पहिला सिनेमा घेऊन येतो आणि तोही बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत. नागराजच्या सिनेमाचं बॉलिवूडच्या परफेक्शनिस्टने आमिर खानने (Aamir Khan) एका शब्दात कौतुक केलंय. सध्या आमिर खानचा 'तो' व्हिडीओ व्हायरल होतोय.(Aamir Khan appriciate Nagraj Manjule and His Jhund Team Watch Video special screening)

नागराजच्या 'झुंड' सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग आमिर खानच्या घरी करण्यात आलं. सिनेमा पाहिल्यानंतर आमिर खान इतकंच उद्गारला....'निःशब्द' 

आमिर खानकडून नागराजच्या सिनेमाचं भरभरून कौतुक 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule)

माझ्याकडे काही शब्दच नाहीत व्यक्त होण्यासाठी...तू जो भारतातील तरूणाईच्या भावना ज्या समजून घेतल्यास ना, त्याचं विशेष कौतुक आहे. 

सिनेमात ज्या मुलांनी काम केलंय. त्याचं देखील विशेष कौतुक. काय सिनेमा बनवला आहे यार? Fantastic.. खूपच युनिक सिनेमा आहे. जी स्पिरिट तुम्ही कॅच केलंय ते लॉजिकने येत नाही. सिनेमाचा एंड रिझल्ट असा आहे की, मी स्पिरिट घेऊन उठतो. हा सिनेमा मला शेवटपर्यंत सोडत नाही. 

एवढ्यावरच आमिर खान थांबला नाही. पुढे तो म्हणतो की, आम्ही जे ३० ते ४० वर्षांत जे केलंय. त्या सगळ्याचा 'फुटबॉल' केलंय. 

आमिरकडून अमिताभ बच्चन यांचं कौतुक 

बच्चन साहेबांनी काय काम केलंय. म्हणजे बच्चन सरांनी आतापर्यंत अनेक बेस्ट सिनेमे दिलेत. पण हा अमिताभ बच्चन यांचा सर्वोत्कृष्ठ सिनेमा आहे. 

आमिर खानकडून सिनेमात केलेल्या सर्व कलाकारांच कौतुक 

आमिर खानने 'झुंड' सिनेमातील प्रत्येक कलाकाराचं कौतुक केलं आहे. तसेच आमिर खानने सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरचं देखील विशेष कौतुक केलं आहे. 

आमिर खानने सगळ्यांना आपल्या घरी नेलं. आणि मुलगा आझादसोबत विशेष ओळख करून दिली. 

आमीरला करायचाय मराठी सिनेमा

आमिर खानने मराठी भाषा दिनानिमित्त एका विशेष मुलाखतीत मराठी सिनेमा करण्याची इच्छा व्यक्त केली. पुढे आमिर खान म्हणाला की, नागराज माझ्यासाठी सिनेमा बनवतंच नाही. म्हणजे नागराज मंजुळेच्या आगामी सिनेमात आमिर खान झळकण्याची शक्यता दाट आहे.