चक्रीवादळात अडकला आमिर खान, आता बचाव मोहिमेचे फोटो होत आहेत Viral

Aamir Khan and Vishnu Vishals Rescue : चक्रीवादळात अडकलेल्या आमिर खान आणि दाक्षिणात्य अभिनेता विष्णु विशाल या दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 5, 2023, 07:21 PM IST
चक्रीवादळात अडकला आमिर खान, आता बचाव मोहिमेचे फोटो होत आहेत Viral title=
(Photo Credit : Social Media)

Aamir Khan and Vishnu Vishals Rescue : चक्रीवादळ मिचौंगनं चेन्नईत खूप नुकसान केलं. यावेळी आलेल्या जोरदार वादळामुळे शहरात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्या सगळ्यामुळे जवळपास दोन दिवस शहर हे ठप्प आहे. या मुसळधार पावसात अभिनेता आमिर खान आणि विष्णू विशाल हे अडकले होते. यात त्या दोघांची सुटका झाल्याची माहिती विष्णू विशालनं दिली आहे. आमिर आणि विष्णू हे करापक्कममध्ये अडकले होते. तिथून अग्निशमन आणि रेस्क्यू विभागानं त्यांना वाचवल्याचे विष्णूनं सांगितले. त्याविषयी विष्णूनं एक खास पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. 

विष्णु विशालनं त्याच्या एक्स म्हणजेच ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. सुरुवातीला त्यानं त्याच्या घरातील आणि त्या आवारातील काही फोटो शेअर केले होते. त्यात चेन्नईला आलेल्या या पुराचे दृश्य पाहायला मिळत आहे. त्यातनंतर त्यानं आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यासाठी एक बोट पाहायला मिळाली आहे. फोटोत आमिर खान देखील दिसत आहे. विष्णु विशालची पत्नी ही बॅडमिंटन खेळाडू असून तिचं नावं ज्वाला गुट्टा आहे. फोटो शेअर करत विशालनं लिहिलं की 'आमच्यासारख्या फसलेल्या लोकांची मदत करण्यासाठी अग्निशमन आणि रेस्क्यू डिपार्टमेंटचे आभार. करापक्कममध्ये बचाव अभियान सुरु झाला आहे. 3 बोट हे आधी पासूनच काम करत आहेत. अशा कठीण काळात तामिळनाडु सरकारकडून खूप चांगल काम करण्यात येत आहे. हे सगळं काम करणाऱ्या प्रशासकीय लोकांचे आभार.'

विशालनं त्याआधी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की करापक्कममध्ये अडकलोय. त्या आधी त्यांनी लिहिलंय की माझ्या घरी पाणी घुसलंय आणि करापक्कममध्ये पाण्याची पातळी खूप वाढली आहे. मी मदतीसाठी फोन केला आहे. ना वीज आहे, ना वायफाय. फोनला सिग्नल देखील नाही. काहीच नाही. टेरेसवर कोणत्या एका ठिकाणी थोडं नेटवर्क येतेय. आशा आहे की मला आणि उपस्थित असलेल्या अनेक लोकांना काही मदत मिळेल. राज्याचे उद्योग मंत्री डॉ टीआरबी राजा यांनी बचाव कार्य सुरु केल्यानंतर संयम बाळगल्यामुळे आमिर खान आणि विष्णु विशालचे कौतुक केले. त्यांनी लिहिले, 'विष्णू विशाल कौतुकाबद्दल धन्यवाद आणि कृपया तुमच्या शेजारी असलेल्या गृहस्थाचे आभार मानतो की इतका छान माणूस आहे! त्याने स्वतःचा बचाव करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही हे आश्चर्यकारक आहे!'

हेही वाचा : एकाच अभिनेत्याला ऑफर झाले होते Animal आणि Sam Bahadur; मग का दिला नकार?

आमिर खान गेल्या महिन्यात चेन्नईला शिफ्ट झाला. त्याची आई जीनम हुसैन या चेन्नईच्या प्रायव्हेट मेडिकल फॅसिलिटीमध्ये होत्या. त्याच्या जवळच्या लोकांनी Indiatoday.in ला दिलेल्या माहितीनुसार, त्याची आमिरनं त्याची आई ज्या मेडिकल सेंटर मध्ये आहे. त्याच्या जवळ असलेल्या हॉटेलमध्ये राहण्याचा प्लॅन करत होता. त्यामुळे जेव्हापण गरज असेल तेव्हा तो त्याच्या आईकडे जाऊ शकेल.