'परफेक्शनिस्ट' आमिरनं केली मुलगा जुनैदच्या बॉलिवूड डेब्यूची घोषणा

आमिर खानचा मुलगा जुनैद खान लवकरच सिल्वर स्क्रीनवर एन्ट्री घेतोय

Updated: Jan 29, 2019, 09:30 AM IST
'परफेक्शनिस्ट' आमिरनं केली मुलगा जुनैदच्या बॉलिवूड डेब्यूची घोषणा title=

मुंबई : बॉलिवूडवर 'नेपोटिझम' अर्थात घराणेशाहीबद्दल कितीही टीका झाली तरी स्टार किडस् काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. गेल्या वर्षी अनेक स्टार किडस् बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसले. काही टॉपवर पोहचले तर काही एक-दोन सिनेमानंतर गायब झाले. पण आता एका अनपेक्षित अशा स्टार किडची बॉलिवूड एन्ट्री निश्चित झालीय... तो म्हणजे परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा... आमिरचा मोठा मुलगा जुनैद लवकरच बॉलिवूड डेब्यु करताना दिसणार आहे. 

जुनैदच्या लॉन्चिंगची अनेक दिवसांपासून चर्चा होती. परंतु, आमिरनं मात्र या विषयावर शांत राहणंच पसंत केलं होतं. त्यामुळे, आमिरला आपल्या मुलांना बॉलिवूडपासून दूर ठेवायचंय का? अशीही चर्चा सुरू झाली होती. परंतु, आता मात्र खुद्द आमिरनंच याबद्दल खुलासा करत जुनैदच्या बॉलिवूड एन्ट्रीची घोषणा केलीय.

जुनैद खान
जुनैद खान

आमची संलग्न वेबसाइट 'बॉलिवूड लाईफ'नं दिलेल्या माहितीनुसार, आमिर खानचा मुलगा जुनैद लवकरच सिल्वर स्क्रीनवर एन्ट्री घेतोय. पण यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. जुनैद लवकरच या क्षेत्रात उतरणार आहे... परंतु, जुनैदच्या एन्ट्रीसाठी सर्वोत्कृष्ट स्क्रिप्टच्या शोधात असल्याचं आमिरनं म्हटलंय. 

जुनैद खान
जुनैद खान

मीडियाशी बोलताना आमिरनं म्हटलंय की, जुनैद स्क्रीन टेस्ट देत होता तेव्हाच मी त्याला म्हटलं होतं की जर तो यात पास झाला तर तो या क्षेत्रात येऊ शकतो पण जर का नापास झाला तर मात्र त्यानं अभिनय क्षेत्रापासून लांबच राहावं... मी जुनैदचं काम पाहिलंय आणि त्याबद्दल मी समाधानीही आहे. आम्हाला जेव्हा योग्य स्क्रिप्ट मिळेल आणि सिनेमावर काम सुरू करू. सध्या आम्ही एका योग्य स्क्रिप्टच्या शोधात आहेत.