संजनाने गुपचुप उरकलं लग्न? नवऱ्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालतानाचा व्हिडिओ व्हायरल

आता संजना गुपचुप विवाहबंधनात अडकल्याची चर्चा रंगते आहे. 

Updated: Feb 13, 2022, 12:14 PM IST
 संजनाने गुपचुप उरकलं लग्न? नवऱ्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालतानाचा व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : आई कुठे काय करते ही मालिका सध्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकेतील अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या संसारातील अनेक टप्पे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. 

या मालिकेतील खलनायिका संजना देखील सगळ्यांचं लक्षवेधून घेत आहे. संजना हे पात्र अभिनेत्री रुपाली भोसले हीने अगदी दमदार पद्धतीने साकारलं आहे. 

संजना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही सध्या चर्चेत आहे. तिचा ब्रेकअप झाल्याची बातमी जेव्हा समोर आली तेव्हा तिच्या चाहत्यांना हा एक धक्काच होता.

संजनाचा घटस्फोट झाला असून ती एका मुलाला डेट करत होती. त्याच्यासोबत ती बऱ्याचदा इव्हेंटला देखील दिसली आहे. पण त्यानंतर काही खाजगी कारणांमुळे दोघांचं नातं तुटलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता संजना गुपचुप विवाहबंधनात अडकल्याची चर्चा रंगते आहे. काही फोटो आणि व्हिडिओंमुळे ही चर्चा सुरु झाली आहे. संजना या व्हिडिओत नववधूच्या पेहरावात दिसत आहे. तर तिच्यासोबत एक समीप नावाचा मुलगा आहे. ज्याच्या सोबत ती लग्नमंडपात सात फेरे घेताना दिसत आहे. 

संजनाने काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्यामुळे अनेकांना असे वाटत होते की संजना लग्नबंधनात अडकली आहे. पण तसं खरं तरं काही झालेलं नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

संजना आता नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. संजना म्हणजेच रुपाली आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या संदर्भातील काही व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.नाते नवेसे हे गाणं ती घेऊन येत आहे.