'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेला दुखापत, फोटो समोर

अभिनेत्री रुपाली भोसलेने फोटो पोस्ट करत होणाऱ्या वेदना चाहत्यांसोबत शेअर केल्या आहे.    

Updated: Apr 19, 2022, 10:53 AM IST
'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेला दुखापत, फोटो समोर  title=

मुंबई : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री रुपाली भोसलेच्या पायाला दुखापत झाली आहे. खुद्द अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत होणाऱ्या वेदना चाहत्यांसोबत शेअर केल्या आहे.  रुपालीला शुटिंगच्या सेटवर दुखापत झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते चिंता व्यक्त करत आहेत. पण रुपालीने प्रकृती सुधारत असून शुटिंग थांवलेली नाही... असं देखील चाहत्यांनी सांगितलं आहे... सध्या तिचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

दुखापतीचा फोटो पोस्ट करत रुपाली म्हणाली, 'मी मिलिंद गवळी (अनिरुद्ध) सोबत शुट करत होती. कथेनुसार, अनिरुद्ध संजनाला घटस्फोट देण्याच्या विचारात असतो.. आणि त्यानंतर संजना रडते आणि खुर्चीत बसते....'

रुपाली पुढे म्हणाली, 'आमच्या दिग्दर्शकांनी मला खुर्चीत बसायला सांगितलं. पण मला वाटले की मी जमिनीवर बसावे आणि आम्ही शॉट घेण्याचे ठरवले.'त्यामुळे मी जोरात जमिनीवर बसले.. '

ती पुढे म्हणते... 'तेव्हा माझ्या अंगठ्याचं नख बाहेर आलं... त्यातून रक्त येत होतं... पण  लाल रंगाची नेलपॉलिश लावली होती... त्यामुळे मला कळालं नाही... त्यानंतर मला तीव्र वेदना जाणवू लागल्याने आम्ही शुट थांबवलं. पाहिलं तेव्हा पायाला गंभीर दुखापत झाली होती.'

महत्त्वाचं म्हणजे रविवार असल्यामुळे सेटवर डॉक्टर नव्हते... पण आता रुपालीची तब्येत उत्तम आहे... असं देखील ती म्हणाली. 'दुखापत झाली आहे, पण शुटिंग थांबवलं नाही.. कारण पुढे मालिकेत अनेक सीक्वेन्स आहेत....'

त्यामुळे 'आई कुठे काय करते' मालिका येत्या काही दिवसांत कोणतं वळण घेते हे पाहाणं तितकचं महत्त्वाचं असणार आहे..  सध्या सर्वत्र मालिकेची चर्चा आहे.