Filmfare मध्ये 12 th Fail ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; रणबीर- विकीही पाहतच राहिले

Filmfare Awards 2024 Winners List : हिंदी कलाजगतामध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कारांचा वितरण सोहळा नुकताच पार पडला.   

सायली पाटील | Updated: Jan 29, 2024, 08:14 AM IST
Filmfare मध्ये 12 th Fail ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; रणबीर- विकीही पाहतच राहिले  title=
69th Hyundai Filmfare Awards 2024 Winners list ceremony Gujarat Tourism 12th fail animal

Filmfare Awards 2024 Winners List : कलाकारांच्या कलेला दाद देत त्यांना आणखी उत्तमोत्तम कलाकृती साकारण्यासाठी प्रोत्साहित करणारा मानाचा असा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच गुजरात येथे पार पडला. कर्टन रेजरनं सुरुवात झालेल्या या सोहळ्यामध्ये मुख्य समारंभानं कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली आणि नव्या दमाच्या कलाकारांच्या कलेला दाद मिळाल्यामुळं हा सोहळा खऱ्या अर्थानं खास ठरला. 

गुजरात पर्यटन मंडळाच्या साथीनं पार पडलेल्या 69th Hyundai Filmfare Awards 2024 मध्ये हिंदी कलाविश्वातील अनेक लोकप्रिय चेहऱ्यांनी हजेरी लावली होती. या कलाकारांच्या मांदियाळीमध्ये अनेकांनीच मानाची अशी Black Lady अर्थात फिल्मफेअरची ट्रॉफी घरी नेण्याचा मान मिळवला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये मोहोर उमटवली ती म्हणजे विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित 12TH FAIL या चित्रपटानं. पुरस्कार सोहळ्याची इतर जेतेपदं नेमकी कोणाला मिळाली?

पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट 
12 th Fail 

सर्वोत्कृष्ट  दिग्दर्शक 
विधु विनोद चोप्रा (12 th Fail )

सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती)
जोराम (देवाशिष मखिजा)

सर्वोत्कृष्ट  अभिनेता 
रणबीर कपूर (अॅनिमल)

सर्वोत्कृष्ट  अभिनेता (समीक्षक पसंती)
विक्रांत मेस्सी (12th Fail)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 
आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती)
राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे)
शेफाली शाह (थ्री ऑफ अस)

सर्वोत्कृष्ट  सहायक अभिनेता 
विकी कौशल (डंकी)

सर्वोत्कृष्ट  सहायक अभिनेत्री 
शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी)

सर्वोत्कृष्ट  गीतकार 
अमिताभ भट्टाचार्य (तेरे वास्ते- जरा हटके जरा बचके)

सर्वोत्कृष्ट संगीत (अल्बम)
अॅनिमल 

सर्वोत्कृष्ट  गायक 
भूपिंदर बब्बल (अर्जन वॅली- अनिमल)

सर्वोत्कृष्ट  गायिका 
शिल्पा राव (बेशरम रंग- पठान)

सर्वोत्कृष्ट कथा 
अमित राय (ओएमजी 2)
देवाशिष मखिजा (जोराम)

सर्वोत्कृष्ट पटकथा 
विधु विनोद चोप्रा (12th Fail)

सर्वोत्कृष्ट संवाद 
इशिता मोइत्रा (रॉकी और रानी की प्रेम कहानी)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत 
हर्षवर्धन रामेश्वर (अॅनिमल)

सर्वोत्कृष्ट छायांकन 
अविनाश अरुण धावरे (थ्री ऑफ अस)

सर्वोत्कृष्ट निर्मिती 
सुब्रता चक्रवर्ती, अमित रे  (सॅम बहादूर)

सर्वोत्कृष्ट वेषभूषा 
सचिन लोवेलेकर, दिव्या गंभीर, निधी गंभीर (सॅम बहादूर)

सर्वोत्कृष्ट ध्वनी 
कुणाल शर्मा (एमपीएसई) (सॅम बहादूर), एसवायएनसी सिनेमा (अॅनिमल)

सर्वोत्कृष्ट संकलन 
जसकुंवर सिंह कोहली- विधु विनोद चोप्रा (12th fail)

सर्वोत्कृष्ट साहसदृश्यं
शिप्रो रझातोस, क्रेग मॅक्रे, यॅनिक बेन, केचा खंपाखडी, सुनिल रोड्रीगेस (जवान)

सर्वोत्कृष्ट VFX 
रेड चिलीज (जवान)

सर्वोत्कृष्ट नृत्य 
गणेश आचार्य (वॉट झुमका)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) 
तरुण दुडेजा (धकधक)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (पदार्पण)
आदित्य रावल (फराझ)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण)
अलिझे अग्निहोत्री (फर्रे)

जीवनगौरव पुरस्कार 
डेविड धवन