51 वर्षाच्या मराठी अभिनेत्याची 18 वर्षांची गर्लफ्रेन्ड

एकेकाळचा मराठी अभिनेता आणि नावाजलेला सुपरमॉडल मिलिंद सोमण याची गर्लफ्रेन्ड 18 वर्षांची असल्याची चर्चा आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 14, 2017, 05:30 PM IST
51 वर्षाच्या मराठी अभिनेत्याची 18 वर्षांची गर्लफ्रेन्ड title=
 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

मुंबई : एकेकाळचा मराठी अभिनेता आणि नावाजलेला सुपरमॉडल मिलिंद सोमण याची गर्लफ्रेन्ड 18 वर्षांची असल्याची चर्चा आहे. या चीनीकम जोडीची चांगलीच चर्चा आहे. तसं चर्चेत राहणं मिलिंद सोमणसाठी नवीन निश्चितच नाही.

मिलिंदपेक्षा 33 वर्ष लहान गर्लफ्रेन्ड

मिलिंद सोबतच्या या मुलीचं नाव अंकिता लोखंडे असल्याचं सांगितलं जात आहे, ती मिलिंदपेक्षा 33 वर्ष लहान आहे. एका कार्यक्रमात ही जोडी झळकली आणि रिलेशनशीपची चर्चा सुरू झाली, मिलिंदच्या इन्स्टाग्रामवरही फोटो झळकतायत. मात्र याविषयी अजून मिलिंद सोमण यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

याआधी मेयलेनी जेम्पोईसोबत लग्न

मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेयलेनी जेम्पोईसोबत लग्न केलं आणि 2009 मध्ये घटस्फोट घेतला, यानंतरमिलिंद सोमणनं आपल्यापेक्षा लहान 21 वर्षाच्या शाहाना गोस्वामीला डेट केलं होतं, पण नंतर त्यांचा ब्रेकअप झालं, यानंतर आता मिलिंदसोबत नव्याने दिसणारी, अंकिता एक एयरहोस्टेस आहे, तसेच मिलिंद आणि तिची ओळख एका रॅम्प वॉकच्या दरम्यान झाली. 

'आयर्न मॅन ऑफ इंडिया' किताब 

मिलिंद सोमणचं आणि ऍथलेटिक्सचंही एक नातं आहे, फ्लोरिडामध्ये आयोजित अल्ट्रामॅन मॅरेथॉनमध्ये मिलिंदने 517 किलोमीटरची शर्यत जिंकली होती. मिलिंदने 2015 मध्येही 'आयर्न मॅन चॅलेंज' स्वीकारून, हे चॅलेंज पूर्ण केलं होतं. यासाठी त्याला 'आयर्न मॅन ऑफ इंडिया' हा किताब देण्यात आला होता. 

मधू सप्रेसोबत जाहिरातीनंतर चर्चेत

मिलिंद सोमण आणि मधू सप्रेने या शू कंपनीसाठी न्यूड पोझ दिल्यानंतर मिलिंद सोमण आणि मधू सप्रे चर्चेत आले होते. ही अॅड 1995 साली आली होती, तेव्हा देखिल मिलिंद आणि मधू सप्रे चर्चेत आले होते.