नवी दिल्ली : नोकरीमध्ये सर्वाधिक पॅकेज देणाऱ्या अॅपलला तोड नाही. मात्र अॅपलमध्ये नोकरी मिळणे तितके सोपे नाही. येथे मुलाखतीत यशस्वी होणे हीच मोठी गोष्ट असते.
येथे नोकरी करण्यासाठी तुमच्याकडे तितकी पात्रता असणे गरजेचे असते मात्र अॅप केवळ डिग्री बघत नाही तर त्यांना अशा व्यक्ती हव्या असतात जे कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी सक्षम असतील. मुलाखतीत अशाच प्रकारचे काही प्रश्न विचारले जातात त्यावरुन अॅपलमध्ये नोकरी दिली जाते.
जाणून घ्या असेच काही प्रश्न आणि
पद : सॉफ्टवेअर इंजीनिअर
पगार : 76 लाख रुपए वार्षिक
प्रश्न : तुमच्याकडे दोन अंडी आहेत. आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही या अंड्यांना जास्तीत जास्त किती उंचावरुन फेकू शकता ज्यामुळे ती फुटणार नाहीत. तुम्ही हे कसं कराल?
पद: सॉफ्टवेअर इंजीनिअर
पगार: 76 लाख रुपये वार्षिक
प्रश्न : तुमच्याकडे १०० नाण एका टेबलावर आहे. यातील दहा नाणी छापा आहेत तर ९० नाणी काटा आहेत. ही नाणी तुम्ही पाहू शकत नाहीत अथवा स्पर्श करु शकत नाहीत. या सर्व नाण्यांना दोन भागांमध्ये विभागा. मात्र प्रत्येक नाण्याची छापा ही बाजू वर असली पाहिजे.
पद : सॉफ्टवेअर इंजीनिअर
पगार : ६६ लाख रुपये वार्षिक
प्रश्न : तीन बॉक्स आहेत. त्यातील एकामध्ये सफरचंद, दुसऱ्या बॉक्समध्ये संत्रे आणि तिसऱ्यामध्ये दोन्ही फळे आहेत. या बॉक्सवर चुकीची लेबल लागली गेलीत. तुम्ही एक बॉक्स उघडला आणि त्यात वाकून न बघता एक फळ उचलले. ते फळ बघून इतर दोन्ही बॉक्सवरील चुकीची लेबल दुरुस्त करा.
पद : एट होम अॅडव्हायजर
पगार : २३ लाख रुपये वार्षिक
प्रश्न : एका ८ वर्षाच्या मुलाला समजवा की मॉडेम अथवा राउटर काय असते आणि ते कसे काम करते.
पद : ग्लोबल सप्लाय मॅनेजर
पगार : ८३ लाख रुपये वार्षिक
प्रश्न : दिवसाला किती मुले जन्मला येतात?
पद : ग्लोबल सप्लाय मॅनेजर
पगार : ८३ लाख रुपये वार्षिक
प्रश्न : या पॅनची कॉस्ट कमी करु शकता?
पद : सॉफ्टवेअर QA इंजीनिअर
पगार : ६६ लाख रुपये वार्षिक
प्रश्न : एका टोस्टरला कसे टेस्ट कराल
पद : सॉफ्टवेअर इजीनिअर
पगार : ७६ लाख रुपये वार्षिक
प्रश्न : तुम्हाला अॅपलमध्ये काम का करायचे आहे. जर तुम्हाला अॅपलने कामाची संधी दिली तर तुम्ही सध्या ज्या ठिकाणी काम करताय तेथील कोणती गोष्ट मिस कराल.
पद : इंजीनिअरिंग प्रोजेक्ट मॅनेजर
पगार : ९१ लाख रुपये वार्षिक
प्रश्न : गेल्या ४ वर्षातील कोणता दिवस तुमचा बेस्ट आणि कोणता दिवस वाईट होता.