हा कोर्स केल्यास तुम्हाला मिळेल ७० हजार रुपयांपर्यंत पगार

नोकरीची काळजी आपल्या प्रत्येकालाच असते. खासकरुन अशा तरुणांना ज्यांना आपल्या परिवाराचा सांभाळ करायचा असतो.

Updated: Nov 10, 2017, 11:21 AM IST
हा कोर्स केल्यास तुम्हाला मिळेल ७० हजार रुपयांपर्यंत पगार  title=

नवी दिल्ली : नोकरीची काळजी आपल्या प्रत्येकालाच असते. खासकरुन अशा तरुणांना ज्यांना आपल्या परिवाराचा सांभाळ करायचा असतो.

पण, आता काळजी करण्याचं कारण नाहीये. कारण, तुमच्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.

जर तुमच्याकडे असलेले ३० हजार रुपये तुम्ही एखाद्या प्रोफेशनल कोर्ससाठी खर्च केले तर तुम्हाला त्यानंतर मिळणाऱ्या नोकरीतून जास्तीत जास्त ७० हजार रुपये पगार मिळू शकतो.

गेल्या काही दिवसांत पारंपारिक कोर्स ऐवजी प्रोफेशनल कोर्सेसची डिमांड अधिक वाढत आहे. कारण, प्रोफेशनल कोर्स केल्यास नोकरी लवकर मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कोर्स संदर्भात सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही ७० हजार रुपयांपर्यंत पगार घेऊ शकता.

सर्टिफाइड फाइनेंशियल प्लॅनर:

सर्टिफाइड फाइनेंशियल प्लॅनर (CFP) कोर्स करण्यासाठी तुम्हाला ३०,००० रुपये खर्च करावे लागतील. कोर्स संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही या इंस्टीट्यूटसोबत संपर्क करु शकता.

सीएफपी हा कोर्स केल्यास तुम्ही सर्टिफाइड फाइनेंशियल प्लॅनर बनून चांगली प्रॅक्टीस सुरु करु शकता. बहूतांश प्रायव्हेट सेक्टर बँक, म्युच्युअल फंड्स हाऊसेज, इंन्शुरन्स कंपन्यांत सीएफपीची आवश्यकता असते. या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मोठ्या प्रमाणात आहे.

कोण करु शकतं सीएफपी कोर्स?

सीएफपी हा कोर्स कुठलाही इंश्युरन्स एजंट, इंश्युरन्स केपीओ प्रोफेशनल, कॉमर्स पदवीधर, विद्यार्थी करु शकतात. फायनानशिअल प्लॅनिंगमध्ये रुची असलेल्या इकोनॉमिक्स, मॅथ्स बॅकग्राऊंड असलेले विद्यार्थीही हा कोर्स करु शकतात.

कुठून करता येईल कोर्स?

सर्टिफाईड फायनानशिअल प्लॅनरचा हा कोर्स अनेक संस्थांमध्ये उपलब्ध आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई), फायनानशिअल प्लॅनिंग स्टँडर्ड बोर्ड ऑफ इंडिया (एफपीएसबीआय), इंटरनॅशनल कॉलेज ऑफ फायनानशिअल प्लॅनिंगसारख्या संस्थांमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे.

८ लाख रुपयांपर्यंत मिळेल वार्षिक उत्पन्न:

सीएफपीचा कोर्स किंवा पदवी मिळवणं खूप कठीण आहे मात्र, एकदा पदवी मिळाली की पगारही चांगला मिळेल. सीएफपी कोर्स केल्यास सुरुवातीला वार्षिक उत्पन्न २ ते ४ लाख रुपयांपर्यंत मिळेल. त्यानंतर अनुभव मिळाल्यास वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांहून अधिक मिळेल.