मुंबई : विद्यापीठाच्या ऑनलाईन असेसमेंट दिरंगाईचा फटका पुन्हा एकदा मुंबईतील ७४० महाविद्यालयांना बसणारेय. गेल्या चार दिवसापासून बंद ठेवण्यात आलेली मुंबईतील महाविद्यालये आता ३१ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत.
मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांची सुट्टी वाढवण्याचा नि्र्णय़ घेतलाय. कुलपती विद्यासागर राव यांनी मुंबई विद्यापीठाला पदवी परीक्षांचे निकाल लावण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत दिलीय. पण पदवी परीक्षांच्या अडीच लाखाहून अधिक उत्तरपत्रिका तपासायच्या बाकी असल्याने महाविद्यालय आणखी काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
पण यामुळे एफवाय, एसवाय आणि टिवायचे सिलॅबस अपूर्ण राहण्याची शक्यताही प्राचार्य वर्गाकडून व्यक्त करण्यात येतेय. सप्टेंबर महिन्यात सर्व महाविद्यालयात पहिली सेमिस्टर पार पडते. त्यामुळे वेळेत सिलॅबस पूर्ण करण्याची जबाबदारीही महाविद्यालयांवर आहे. ऑनलाईन असेसमेंटच्या घोळामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे.