मुंबई : जर तुम्हाला चांगली नोकरी हवी असेल तर स्वत:च्या बॉडी लॅंग्वेजकडे लक्ष देणं गरजेच आहे. नोकरी मिळण्याचं मार्ग मुलाखतीतून जात असतो. आपल्याला वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान असण्यासोबत आपण कसे व्यक्त होतोय याकडे मुलाखत घेणाऱ्यांचे लक्ष असते. यामुळे काही गोष्टी आपण नक्की लक्षात ठेवायला हव्यात.
आपल्या भीतीवर मात करत डोळ्यात विश्वास दाखवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. मुलाखत घेणाऱ्यांबद्दल आपल्याला माहिती असेल तर तुम्ही थोडेफार कम्फर्ट राहू शकता. यासोबतच मुलाखतीत कोणकोणते पॉईंट्स विचारले जाऊ शकतात हे काढून ठेवणंही गरजेचं आहे.
मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची डोळ्यात डोळे टाकून प्रश्नांची उत्तरे देता आली पाहीजेत. पण याचा अतिरेकही करता कामा नये. जास्त एकटक बघणं किंवा न बघणं हे देखील नोकरी मिळण्या- न मिळण्याचं कारण ठरू शकतात.
मुलाखत घेताना सुरुवात हात मिळविण्यापासून होते. हॅंड शेक करताना समोरच्याच्या हाताचे बारीक निरीक्षण करा आणि त्याच पद्धतीने हात मिळवा. जास्त जोराने हात मिळवणं ओव्हर कॉन्फिडन्स दाखवतो. त्यामुळे याचा नकारात्मक परिणामही होऊ शकतो.
हात चोळत राहणं किंवा हातात हात बांधून ठेवणं योग्य दिसत नाही. त्यामुळे मुलाखती दरम्यान आपले हात मांडीवर किंवा चेअरवर असू द्या. बोलताना खूप जास्त हातवारे करू नका.