ठाणे महानगरपालिकेत आरोग्य विभागात भरती

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली स्थिती रोखण्यासाठी ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत, त्यासंदर्भात ही भरती केली जात आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेत आरोग्य विभागात पदे भरली जाणार आहेत.

Updated: Mar 24, 2021, 07:37 PM IST
ठाणे महानगरपालिकेत आरोग्य विभागात भरती title=

ठाणे : कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली स्थिती रोखण्यासाठी ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत, त्यासंदर्भात ही भरती केली जात आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेत आरोग्य विभागात पदे भरली जाणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान आज महाराष्ट्राला आहे. त्या अनुशंगाने ठाणे महानगरपालिका, आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

यामुळे सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी ३१ मार्च २०२१ रोजी थेट मुलाखतीकरीता स्वखर्चाने उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे. ही भरती कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर होत आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोना फैलाव  रोखण्यासाठी आरोग्य विभागात ही तातडीने भरती करण्यात येत आहे.

मानधन- पे स्केल – 40 हजार रुपये.

वयाची आट - ऑफिस अटेंडंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 16 मार्च 2021 रोजी

किमान वय - 18 ते जास्तीत जास्त 38 वर्ष असायला हवे. मागासवर्गीयासाठी 5 वर्ष सूट

मुलाखतीचा पत्ता – ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका भवन चंदनवाडी, अल्मेडा रोड, पांचपाखाडी, पिनकोड- ४००६०६