कितीही टक्के मार्क्स मिळवा, सक्सेससाठी ही कौशल्ये हवीच, अन्यथा...

या कौशल्यांच्या जोरावरच तुम्ही तुमच्या क्षेत्रात मोठी मजल मारू शकता.

Updated: Jul 18, 2018, 01:59 PM IST
कितीही टक्के मार्क्स मिळवा, सक्सेससाठी ही कौशल्ये हवीच, अन्यथा... title=

नवी दिल्ली: आपल्यापैकी अनेकांकडे आवश्यक ती पदवी असते. त्यांनी ती पदवी चांगल्या गुणांनीही मिळवलेली असते. पण, तरीही हे मंडळी करिअरमध्ये फारशी मजल मारू शकत नाहीत. त्यांना म्हणावे तसे यश मिळत नाही. यावरून तुमच्या ध्यानात आलेच असेल की, करिअरमध्ये पुढे जायचे तर, शिक्षणासोबतच आणखीही काही गोष्टी हव्यात. या गोष्टी म्हणजेच तुमचे सॉफ्ट स्किल. ज्याला आपण इतर कौशल्ये असेही म्हणू शकतो. या कौशल्यांच्या जोरावरच तुम्ही तुमच्या क्षेत्रात मोठी मजल मारू शकता. 

संवादकौशल्य

आपले संवादकौशल्यावर प्रभुत्व पाहिजे. तुम्ही तुमच्या बॉसच्य पुढे असा किंवा समुहामध्ये, कोणाशी ऑनलाईन बोलत असा किंवा कोणा एका व्यक्तिशी तुमच्यात तेवढी क्षमता पाहिजे. जेणेकरून तुम्ही तुमच्या समोरच्या व्यक्तिचे लक्ष तुमच्याकडे खेचून घेऊ शकाल. तुमच्या बोलण्यानंतर तुम्हाला कोणी प्रतिप्रश्न केला तर, अत्यंत सभ्यपणे तुम्हाला त्याचे उत्तर देता यायला हवे. अनेकदा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला न येण्याची शक्यता आहे. अशा वेळी तुम्हाला समोरच्या व्यक्तिला हाताळता आलं पाहिजे.

देहबोली

कोणत्याही व्यक्तिवर, समुहावर सर्वात आधी प्रभाव टाकणारी गोष्ट म्हणजे तुमची देहबोली. त्यामुळे आपल्या देहबोलीबद्धल मानसाने नेहमीच सतर्क असायला हवे. तुमची देहबोली जर प्रभावी असेल तर, नक्कीच तुम्ही समोरच्या व्यक्तिवर प्रभाव टाकू शकता. मग ही व्यक्ती तुमचा बॉस असो किंवा समूह अथवा ग्राहक. 

समयसूचकता

बोलता सर्वांनाच येते. पण, बोलताना समयसूचकता महत्त्वाची. तुम्ही कोठे बोलता आहात, काय बोलता आहात, कोणत्या विषयावर बोलता आहात हे अत्यंत महत्त्वाचे असते. नको त्या ठिकाणी तुम्ही उगाच पाल्हाळ लावत बसला तर, लोक तुमची चेष्टा करतील. पण, योग्य वेळी योग्य शब्दात तुम्ही तुमचे म्हणने प्रभावीपणे मांडले तर मात्र, लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. म्हणूनच तूमच्याकडे समयसूचकता महतत्वाची.

वक्तशिरपणा

कोणतेही काम ठरल्या वेळी होणे महत्त्वाचे. तरच तुम्ही यशाचा आलेख वाढवू शकता. अन्यथा नाही. म्हणून तुमच्याकडे वक्तशिरपणा हवा.

वेशभुषा

भलेही तुम्ही कितीही विद्वान असा. पण, आजच्या जगात तुम्हाला वेशभुषेचे भान नसेल तर, तुम्हाला मर्यादा पडतात. त्यामुळे आपल्य कपड्यांच्याबाबतीत अत्यंत दक्ष रहा. कार्य, स्थळ, वेळ यांचे भान न बाळगता केलेला पोशाख हा समोरच्या व्यक्तिवर तुमचा प्रभाव नकारात्मक पाडतो.