कागदापासून बर्डहाऊस (Birdhouse)कसे बनवाल?

घर सुंदर बनविण्यासाठी अनेक लोक भरमसाठ खर्च करतात. पण, कधी कधी तुम्हाला खर्च न करता आणि घरातील टाकाऊ वस्तूंपासूनही घराचे सौदर्य वाढवता येते. जसे की, कागदापासून बर्डहाऊस बनवून.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 21, 2017, 11:02 PM IST
कागदापासून बर्डहाऊस (Birdhouse)कसे बनवाल? title=

मुंबई : घर सुंदर बनविण्यासाठी अनेक लोक भरमसाठ खर्च करतात. पण, कधी कधी तुम्हाला खर्च न करता आणि घरातील टाकाऊ वस्तूंपासूनही घराचे सौदर्य वाढवता येते. जसे की, कागदापासून बर्डहाऊस बनवून.

गंमत अशी की, घराचे सौदर्य वाढविण्यासाठी अनेक लोक पक्षी पाळतात. त्यांच्यासाठी पक्षीघर बनवतात. पण. जरूरी नाही की, घराचे सौदर्य वाढण्यासाठी पक्षीच पाळायला हवेत. अगदी पक्षी न पाळताही तुम्ही छानसे पक्षीघर बनवू शकता. ज्यामुळे तुमच्या घराला एक वेगळेच सौदर्य प्राप्त होऊ शकते.

बर्डहाऊस (Birdhouse)बनविण्यासाठी आवश्यक सामग्री

-तुमच्या आवडीचे पेपर (कागदी पुठ्ठे)
- कात्रीत
-ग्लू
- जुन्या डब्यांची टोपणं...

बर्डहाऊस (Birdhouse)कसे बनवाल....?

1 - सर्वप्रथम जून्या डब्यांची झाकणं पपर्सनी पूर्ण गुंडाळून घ्या.
2 नंतर पेपरला लांब-लांब स्ट्राइप्समध्ये कापा. नंतर ग्लूच्या मततीने ही झाकने चारही बाजूने चिटकवा...
3- आता पेपरने छोटी चिमणी बनवा. तिला धाग्याच्या मततीने बर्डहाऊसला लटकवा.
4 बस्स.. झाले आपले पेपर बर्डहाऊस तया....
5 आता तुम्ही तुमचे घर कागदी बर्डहाऊसे हवे तितके सजवू शकता....