सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

आज सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. 

Updated: May 28, 2017, 11:14 AM IST
सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर title=

मुंबई : आज सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. यंदा देशभरातून सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेला १० लाख ९८ हजार ४२० विद्यार्थी बसले होते. ३ हजार ५०३ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती.

तर इकडे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परिक्षेचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. निकालाचं काम अतिम टप्प्यात असून येत्या सोमवारी निकालाची तारीख जाहीर करणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

यंदा राज्यातल्या नऊ विभागातून 15 लाख 5 हजार 365 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात 8 लाख 48 हजार 939 विद्यार्थी तर 6 लाख 75 हजार 436 विद्यार्थिनींनी ही परीक्षा दिली होती. 

निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

http://cbseresults.nic.in/