कुलदीपची ही कॅच पाहून तुम्हाला 'लोहा' फिल्ममधील धर्मेंद्र आठवेल

लोहा ही फिल्म 1987 ला प्रदर्शित झाली होती.

Updated: Apr 9, 2019, 09:21 AM IST
कुलदीपची ही कॅच पाहून तुम्हाला 'लोहा' फिल्ममधील धर्मेंद्र आठवेल title=

बंगळुरु : कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यात झालेल्या मॅचमध्ये कोलकाताने बंगळुरुचा 5 विकेटने पराभव केला. या मॅचमध्ये कुलदीप यादवने आपल्याच बॉलिंगवर बंगळुरुचा कॅप्टन विराट कोहलीला कॅच आऊट केले. त्याने जी कॅच घेतली ती कॅच पाहून तुम्हाला नक्कीच 'लोहा' सिनेमातील धर्मेंद्रची आठवण झाली असेलच.

 

कुलदीप यादव आपल्या स्पेलमधील चौथी ओव्हर टाकायला आला. ही मॅचची 18 वी ओव्हर होती. कोहली 84 रनवर खेळत होता. कुलदीपने आपल्या चौथ्या ओव्हरच्या पहिलाच बॉल फुल लेंथवर टाकला. कोहलीने फटका मारण्याच्या नादात कुलदीपच्या हाताता कॅच देऊन बसला. आपल्याच बॉलिंगवर कॅच घेणे वाटते तेवढे सोपे नसते. कुलदीपने विराटची बुलेटपेक्षा वेगात आलेली कॅच घेतली. त्यामुळे विराटला बाहेरचा रस्ता धरावा लागला. विराटचे शतक अवघ्या 14 रनने हुकले होते.

कुलदीपने घेतलेल्या वेगवान कॅच पाहून लोहा या हिंदी फिल्ममधील दृश्य नक्कीच आठवले असेल. लोहा ही फिल्म 1987 ला प्रदर्शित झाली होती. ही एक ऍक्शन फिल्म होती. फिल्म शेवटच्या टप्प्यात होती. एका गुफेतून रामी रेड्डी एन्ट्री घेतो. त्याच्यासमोर एका दगडावर धर्मेंद बसलेला असतो. दोघे समोरासमोर आल्यानंतर डॉयलॉगबाजी होते. यानंतर रामी रेड्डी धर्मेंद्रवर गोळी झाडतो. धर्मेंद्र ती गोळी आपल्या हाताने अडवत म्हणतो की, 'तुम्हारी ये गोली, इस शरीर के पार नही जा सकती' . ज्या वेगाने कोहलीने हा शॉट मारला होता, तो शॉट बुलेटगनच्या वेगाइतकाच होता. परंतू कुलदीपने काही सेकंदाच्या अवधीतच ती कॅच घेत, कोहलीला 84 रनवर रोखले.

बंगळुरुने कोलकाताला विजयासाठी 206 रनचे आव्हान दिले होते. परंतू अखेरच्या टप्प्यात आंद्रे रसेलने केलेल्या नॉटआऊट 48 रनची तडाखेदार खेळी केली. रसेलच्या या खेळीमुळे अशक्य वाटणारी मॅच कोलकाताने जिंकली. कोलकाताने प्रथम टॉस जिंकून बंगळुरुला बॅटिंग करण्यास भाग पाडले होते. विराट कोहलीने चांगली खेळी केली. कोहलीने 49 बॉलमध्ये 84 रन केल्या. या खेळीमध्ये कोहलीने 9 फोर आणि 2 सिक्स लगावले.