आयपीएल २०२० : पंजाबची बॅंगलोरवर ८ विकेट्सनी मात

 पंजाबने रॉयल चॅलेंजर्सवर ८ विकेट्सने मात केलीय.

Updated: Oct 15, 2020, 11:10 PM IST
आयपीएल २०२० : पंजाबची बॅंगलोरवर ८ विकेट्सनी मात  title=

दुबई : आयपीएल २०२० च्या ३१ व्या मॅचमध्ये पंजाबने रॉयल चॅलेंजर्सवर ८ विकेट्सने मात केलीय. बॅंगलोरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅंगलोर प्लेईंग इलेव्हनच्या कोणताही बदल करण्यात आला नव्हता तर पंजाबच्या टीममध्ये तीन बदल करण्यात आले होते. 

टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरने २० ओव्हरमध्ये ५ विकेट्सच्या बदल्यात १७१ रन्स बनवले आणि पंजाबला १७२ रन्सचे लक्ष्य दिले. आरसीबीकडून कॅप्टन विराट कोहलीने सर्वाधिक ४८ रन्स बनवले. 

पंजाबतर्फे कॅप्टन केएल राहूलने पुन्हा एकदा मोर्चा संभाळला. केएल राहूलने ३७ बॉल्समध्ये अर्धशतक पूर्ण केलं. या सिझनमधील त्याने चौथे अर्धशतक पूर्ण केले.  मयंक अग्रवालने २५ बॉल्समध्ये ४५ रन्स केले. त्याला चहलने बोल्ड केले.