नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दरम्यान सिडनीमध्ये टेस्टचा पाचवा दिवस ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)यांच्या नावे राहीला. पण स्टीव स्मिथ (Steve Smith) आपल्या कृत्यामुळे ट्वीटरवर ट्रेंड करु लागलाय.
मॅचच्या चौथ्या डावादरम्यान ड्रिंक्स ब्रेक झाल्यावर ऋषभ पंत (Rishabh Pant) पीच सोडून पाणी पिण्यासाठी गेला. यावेळी संधीचा फायदा घेत स्टीव स्मिथ (Steve Smith) पीचला नुकसान पोहोचवण्याचे काम केले. ऑस्ट्रेलिया टीम विकेट घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते हे या प्रसंगातून दिसले. आपल्या बॉलर्सना मदत करण्यासाठी स्मिथने हे टोकाचं पाऊल उचलंल.
Australia's Steve Smith shadow-batted as he came to the crease after the drinks break, and proceeded to remove Rishabh Pant's guard marks.
#INDvAUS pic.twitter.com/YrXrh3UlKl
— Manoj Singh Negi (@Manoj__negi) January 11, 2021
स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) चा हा कारनामा स्टम्पला असलेल्या कॅमेरामध्ये कैद झाला. ऑस्ट्रेलियन मीडियाने हा प्रकार लपवण्याचा खूप प्रयत्न केला. पण यावेळी टीव्हीवर फुटेज दिसू लागले होते. यात स्मिथचा पिचला नुकसान पोहोचवण्याचा गुन्हा स्पष्ट दिसतोय. दरम्यान पिचवर परत आलेल्या पंतने आपल्या बॅटने पुन्हा तो भाग समतोल केला.
स्टीव्ह स्मिथचे कृत्य आयसीसीची आचारसंहिता (ICC Code of Conduct)अनुच्छेद 2.10 चे उल्लंघन आहे. अनुचित खेळामध्ये हा प्रकार मोजला जातो. जाणिवपूर्वक पिचला नुकसान पोहोचवणाऱ्या खेळाडूस 1 किंवा लेव्हल 2 चा अपराध मानला जातो. यासाठी स्मिथवर मोठी कारवाई केली जाऊ शकते.
2018 मध्ये स्मिथ बॉल टॅम्परिंगच्या 2018 Australian Ball-Tampering Scandal) प्रकरणात अडकला होता. जे सॅंडपेपरगेट स्कॅंडल म्हणून ओळखले जाते. एकेकाळी स्मिथ टीम ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होता. पण अशा कृत्यांमुळे त्याला आपली कॅप्टन्सी गमवावी लागली.