Imran Khan X-Wife Marriage: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची पूर्वाश्रमीची पत्नी (X-Wife) रेहम खानने (reham khan) तिसर्यांदा लग्न केले आहे. रेहमने तिच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान बिलालशी (Mirza Bilal) लग्न केले आहे. या लग्नाबाबतची घोषणा तिने सोशल मीडियावर केली आहे. या लग्नाची आता एकच चर्चा सुरू झाली आहे.
इम्रान खान (Imran Khan) यांची माजी पत्नी (X-Wife) रेहम खानने (reham khan) पाकिस्तानी अभिनेता आणि व्यंगचित्रकार मिर्झा बिलाल (Mirza Bilal) यांच्याशी लग्न केले आहे.49 वर्षीय रेहमने ट्विट करून याबाबतची घोषणा केली आहे. या ट्विटमध्ये तिने म्हटलेय की,अमेरिकेतील सिएटल शहरात एका साध्या सोहळ्यात बिलालसोबत लग्न केले आहे.
रेहम खानने (reham khan) बिलालसोबतचा (Mirza Bilal) लग्नाचा फोटोही तिने ट्विटरवर शेअर केला आहे. पहिल्या फोटोत, दोघेही हात धरून त्यांच्या लग्नाच्या अंगठी दाखवताना दिसत आहेत. रेहम आणि बिलाल या दोघांचे हे तिसरे लग्न आहे.
Finally found a man who I can trust @MirzaBilal__ pic.twitter.com/nx7pnXZpO6
— Reham Khan (@RehamKhan1) December 23, 2022
बिलाल (Mirza Bilal) सूरूवातीला एक मॉडेल होता.'द 4 मॅन शो', 'दिल पे मत ले यार' आणि 'नॅशनल एलियन ब्रॉडकास्ट' सारख्या शोचा भाग होता. रेहमचे पहिले लग्न मनोचिकित्सक इजाज रहमान यांच्याशी झाले होते. त्यांनी 1993 मध्ये लग्न केले आणि 2005 मध्ये घटस्फोट घेतला, अशी माहिती एका पोर्टलने दिली आहे.
ब्रिटिश-पाकिस्तानी पत्रकार रेहमने (reham khan) 2014 मध्ये खानसोबत लग्न केले होते आणि एका वर्षाच्या आतच 2015 मध्ये हे लग्न तुटले. रेहमने इम्रान खानसोबत दुसरे लग्न केले जे फक्त 10 महिने टिकले. त्यांनी 2014 मध्ये लग्न केले आणि 2015 मध्ये वेगळे झाले होते.
दरम्यान आता इम्रान खान (Imran Khan) यांची माजी पत्नी (X-Wife) रेहम खानच्या (reham khan) या लग्नाची एकच चर्चा रंगली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.